Premium

एम. एस. स्वामीनाथन यांचे कृषीसंशोधन क्षेत्रातील योगदान काय? वाचा सविस्तर…

एम. एस. स्वामीनाथन यांनी डॉक्टर व्हावे असे त्यांच्या वडिलांना वाटायचे. मात्र त्यांनी कृषी क्षेत्रात संशोधन करण्याचे ठरवले.

MS Swaminathan
एम. एस. स्वामीनाथन (फोटो सौजन्य- Express Archive Photo)

भारताला अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी बनण्यासाठी मोलाची भूमिका बजावणारे तसेच भारतातील हरितक्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे वैज्ञानिक एम. एस. स्वामीनाथन यांचे गुरुवारी (२८ सप्टेंबर) निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन कृषी क्षेत्रातील संशोधनास वाहून घेतले होते. स्वामीनाथन यांच्या जाण्याने जागतिक कृषी क्षेत्राचे अपरिमित नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर गरीबांचं कल्याण व भूकमुक्ती हा ध्यास जगलेले एम. एस. स्वामीनाथन कोण होते? त्यांना हरितक्रांतीचे जनक का म्हटले जाते? हे जाणून घेऊ या….

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वामीनाथन आयपीएस अधिकारी होते. मात्र कृषीक्षेत्रातील संशोधनाची त्यांना जास्त आवड असल्यामुळे त्यांनी राजीनामा देत कृषी संशोधाला स्वत:ला वाहून घेतले. आपल्या कारकिर्दीत त्यांनी वेगवेगळ्या संस्थांत महत्त्वाची भूमिका बजावली. इंटरनॅशनल युनियन फॉर द कन्झर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेसचे १९८४ ते ९० या काळात ते अध्यक्ष होते. १९८९ ते ९८ या काळात ते वर्ल्डवाइड फंड फॉर नेचर (इंडिया) चे अध्यक्ष आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (ICAR) महासंचालक होते. यासह त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या जाबदाऱ्या पार पाडल्या.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ms swaminathan passes away know about his contribution in agricultural development in india prd

First published on: 28-09-2023 at 20:01 IST
Next Story
परकीय देणगी घेणाऱ्या एनजीओंसाठी मोदी सरकारचे नवे नियम