जर तुमचे पालक वृद्ध असतील आणि त्यांचे वय ६५ वर्षांपेक्षा जास्त असेल आणि तुम्हाला त्यांच्यासाठी आरोग्य विमा पॉलिसी घ्यायची असेल, तर आता ते तुमच्यासाठी शक्य होणार आहे. खरं तर विमा नियामक IRDAI ने आरोग्य विमा खरेदीशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल केला आहे आणि पॉलिसी खरेदी करणाऱ्या लोकांसाठी ६५ वर्षांची वयोमर्यादा काढून टाकण्यात आली आहे. यापूर्वी ग्राहक केवळ ६५ वर्षे वयापर्यंत नवीन आरोग्य विमा पॉलिसी घेऊ शकत होते. परंतु आता ज्येष्ठ नागरिक त्यांचे वय ८० किंवा ९० वर्षे असले तरीही ते आता आरोग्य विमा खरेदी करू शकणार आहेत. ६५ वर्षांवरील सर्व भारतीयांसाठी हा मोठा दिलासा आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) ने विमा कंपन्यांना त्यांच्या नेहमीच्या आरोग्य पॉलिसी ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि लहान मुलांसह प्रत्येकासाठी उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे. सत्ताधारी भाजपाने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात ७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाला सरकारच्या आयुष्मान भारत आरोग्य विमा योजनेत आणले जाणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर हे नियम बदलण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा