संयुक्त अरब अमीराती अर्थात यूएईने परदेशी नागरिकांना व्हिसा देण्याच्या आपल्या नियमांत मोठे बदल केले आहेत. यामध्ये परदेशी नागरिकांना यूएईमध्ये राहण्याचा कालावधी वाढवण्यात आला आहे. तसेच व्हिसा मिळण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. यूएई सरकारच्या या बदललेल्या धोरणामुळे विद्यार्थी, संशोधक, उद्योजक, व्यावसायिक यांना फायदा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर यूएईने आपल्या व्हिसा वितरणाच्या धोरणात काय बदल केला आहे? यावर एक नजर टाकुया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रेसिडेन्सी आणि फॉरेनर्स अफेयर्सचे महासंचालक सुलतान युसुफ अल नुयामी यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. यूएईमधील जीवनमान उंचावण्यासाठी, तसेच येथे जगण्याच्या अनुभव, गुंवतवणूक सुकर होण्यासाठी आम्ही व्हिसाच्या नियमांमध्ये बदल केला आहे, असे नुयामी यांनी सांगितले आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : सलग सहाव्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरणाऱ्या इंदूरचे ‘स्वच्छता मॉडेल’ नेमके आहे तरी काय?

ग्रीन व्हिसा

ग्रीन व्हिजाच्या माध्यमातून परदेशी नागरिकांना यूएईमध्ये पाच वर्षे राहण्याची परवानगी दिली जाते. आता हा व्हिसा मिळण्यासाठी परदेशी नागरिकांना यूएईमधील कोणत्याही नागरिकाची किंवा नोकरी देणारी संस्था, व्यक्तीच्या शिफआरशीची गरज भासणार नाही. फ्रिलान्सर्स किंवा स्वयंरोजगार निर्माण करणारे, कुशल कामगार तसेच गुंतवणकादार आणि त्यांचा परिवार या सर्वांना हा व्हिसा मिळू शकणार आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : अल्झायमर्स रोखणे आता दृष्टिपथात? नवीन औषधाविषयी आशादायक बाबी कोणत्या?

ज्या परदेशी नागरिकाकडे ग्रीन व्हिसा असेल, तो आपल्या परिवारालाही यूएईमध्ये घेऊन जाऊ शकणार आहे. यामध्ये जोडीदार, मुले तसेच जवळच्या नातेवाईकांचा समावेश आहे. ग्रीन व्हिसा असलेल्या पालकांना आपल्या २५ वर्षापर्यंतच्या मुलाला यूएईमध्ये घेऊन येता येणार आहे. ही वयोमर्यादा अगोदर १८ वर्षांची होती. तसेच लग्न न झालेली मुलगी आणि अपंग पाल्यांना वयाची मर्यादा नाही. याबाबतचा नियम यूएई सरकारने जूनमध्येच जारी केला होता. ग्रीन व्हिसाधारकाची मुदत संपल्यानंतर आणखी ६ महिन्यांसाठी त्यांना यूएईमध्ये राहण्याची परवानगी असेल.

हेही वाचा >>> विश्लेषण : भारतीय केळ्यांना मागणी का?

लोल्डन व्हिसा

ग्लोडन व्हिसा मिळण्यासाठीही यूएई सरकारने नियमांत अनेक बदल केले आहेत. गोल्डन व्हिसा असणाऱ्या परदेशी नागरिकांना यूएईमध्ये १० वर्षे राहता येते. हा व्हिसा गुंतवणूकदार, उद्योजक, संशोधक, वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे, विज्ञान, ज्ञान क्षेत्रात काम करणारे, विद्यार्थी, पदवीधर यांना दिला जातो. देशात गुंतवणूकदार आणि प्रतिभावाना लोकांना आकर्षित करण्यासाठी यूएई सरकारने २०२० साली गोल्डन व्हिसा देण्यास सुरुवात केली होती. एकट्या दुबाईमध्ये २०२० साली ४४ हजार लोकांना हा व्हिसा देण्यात आला होता.

हेही वाचा >>> विश्लेषण : राज्यातील जमिनींच्या लाखो मोजण्या कशामुळे रखडल्या?

बदलेलल्या नियमांनुसार लोग्डन व्हिसा असणाऱ्या परदेशी नागरिकांना एखाद्या उद्योगाची १०० टक्के मालकी मिळवता येईल. गोल्डन व्हिसा असलेली एखादी व्यक्ती सहा महिन्यांपेक्षा यूएईबाहेर राहिली तर त्याचा व्हिसा रद्द होत असे. मात्र आता तसे होणार नाही. गोल्डन व्हिसा असणाऱ्या परदेशी नागरिकांना आता घरकाम करणाऱ्या कामगारांना यूएईमध्ये नेता येणार आहे. यामध्ये कामगारांच्या संख्येवर मर्यादा नसेल. तसेच गोल्डन व्हिसाधारक त्यांच्या परिवारालाही यूएईमध्ये घेऊन येऊ शकतात. यामध्ये पत्नी, मुलांचा समावेश आहे. गोल्डन व्हिसा असणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही त्या व्यक्तीचे कुंटुंबीय यूएईमध्ये वास्तव्य करण्यास पात्र असतील.

हेही वाचा >>> विश्लेषण : सुरजापुरी आणि बज्जिका या भाषांच्या संवर्धनासाठी नितीश कुमार यांची विशेष मोहीम, जाणून घ्या नेमकं कारण

बदललेल्या नियमांनुसार आता विज्ञान, अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान, उद्योग, प्रशासन, शिक्षण या क्षेत्रात काम करणाऱ्यांनाही १० वर्षांसाठी गोल्डन व्हिसा देण्यात येईल. त्यासाठी महिन्याचा पगार ११.१ लाख रुपयांवरून ६.६ लाख रुपये एवढा करण्यात आला आहे.

पर्यटन व्हिसामध्ये काय बदल झाला?

टुरिस्ट व्हिसाच्या माध्यमातून आता परदेशी नारिकांना ६० दिवस यूएईमध्ये राहता येणार आहे. यापूर्वी टुरिस्ट व्हिसा असलेल्या परदेशी नागरिकांना फक्त ३० दिवस यूएईमध्ये राहता येत असे. यूएई सरकारने नवा मल्टी एन्ट्री टुरिस्ट व्हिसा काढलेला आहे. या व्हिसाच्या माध्यमातून परदेशी नागरिकांना ९० दिवसांसाठी यूएईमध्ये राहता येणार आहे.

More Stories onयूएई
मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uae government change visa rules know what benefits to tourist businessmen student prd
First published on: 03-10-2022 at 16:18 IST