Premium

विश्लेषण : IMF बेलआऊट म्हणजे काय?, ते देशाला कधी मिळते आणि कर्ज देण्याच्या अटी काय?

IMF ची स्थापना १९४५ मध्ये त्यांच्या स्वतःच्या निर्यातीला चालना देण्याचा प्रयत्न करणार्‍या देशांद्वारे प्रतिस्पर्धी देशाच्या चलनाचे अवमूल्यन रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय आर्थिक समन्वय घडवून आणण्याच्या उद्देशाने करण्यात आली.

IMF bailout explainer
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF)

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कार्यकारी मंडळाने गेल्या आठवड्यात श्रीलंकेसाठी सुमारे ३ अब्ज डॉलरच्या बेलआऊट पॅकेजला मंजूर दिली, ज्यापैकी सुमारे ३३३ दशलक्ष डॉलर देशाच्या मानवतावादी संकटाला दूर करण्यासाठी त्वरित वितरित केले जाणार होते. दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी यासंदर्भात भाष्य केले. IMF ने त्यांच्या देशाला बेलआऊट निधी जारी करण्यासाठी बाहेरून येणाऱ्या वित्तपुरवठ्याबाबत मित्र देशांनी वचनबद्धतेची पूर्तता करावी, अशी त्यांची इच्छा आहे. कर्जात बुडालेला पाकिस्तान देश १.१ अब्ज डॉलर निधी पुन्हा पूर्ववत व्हावा यासाठी चालू वर्षाच्या फेब्रुवारीपासून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी चर्चा करीत आहे. हा निधी पाकिस्तानला मागील वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात मिळणार होता. मात्र तो अद्याप मिळालेला नाही. पाकिस्तान मागणी करत असलेला निधी २०१९ मध्ये मान्य झालेल्या ६.५ अब्ज डॉलर बेलआउटचा भाग आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

IMF बेलआऊट्स काय आहे?

सर्वसाधारण अर्थाने बेलआऊट म्हणजे दिवाळखोरीच्या धोक्याचा सामना करणार्‍या देशाला पाठबळ देणे होय. जेव्हा देशांना आर्थिक जोखीम, चलन संकटांचा सामना करावा लागतो आणि बाहेरच्या देशांकडून मिळणाऱ्या कर्जाच्या दायित्वांची पूर्तता करण्यासाठी आणि त्यांच्या चलनांचे विनिमय मूल्य वाढवण्यासाठी सहाय्याची आवश्यकता असते, तेव्हा IMF कडून बेलआऊट दिले जाते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 11:52 IST
Next Story
विश्लेषण: इस्रोच्या ‘वनवेब’ मोहिमेचे यश महत्त्वाचे का?