करोना महासाथीचा संपूर्ण जगालाच तडाखा बसलाय. या वैश्विक संकटामुळे भारतासह अनेक देशांच्या विकासदाराला खीळ बसली. आता जागतिक व्यापारासह अन्य व्यवहार सुरळीत झालेले असतानाच रशिया-युक्रेन युद्धामुळे संपूर्ण जगाची चिंता वाढलेली आहे. या सर्व घडामोडींचा जागतिक अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम झाल्याचे दिसत आहे. जागतिक बँकेने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालातून हे स्पष्ट होत असून, या अहवालानुसार २०३० सालापर्यंत जागतिक आर्थिक विकासदर २.२ टक्के म्हणजेच तीन दशकांच्या नीचांकी पातळीवर जाण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर जागतिक बँकेच्या ताज्या अहवालात काय आहे? भारताच्या आर्थिक प्रगतीची काय स्थिती असेल? याबाबत जाणून घेऊया.
प्रिय वाचकांनो,
जागतिक अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून वर्ष २०२३ ची सुरुवात सौम्य आशावादानं झाली होती. मुख्य धोरणकर्ते आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी दावोसमध्ये भेटत होते, त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था २०२३ मध्ये मंदीची शक्यता टाळू शकेल, अशी भावना निर्माण झाली होती. जानेवारीमध्ये IMF च्या जागतिक आर्थिक दृष्टिकोनाने त्या कल्पनेवर एक शिक्कामोर्तब केले होते. त्यामुळे बँकिंग क्षेत्रातील नुकत्याच झालेल्या घसरणीने पुन्हा मंदीची भीती वाढवली आहे.
मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.