मागील काही दिवसांपासून उत्तर भारतात गुरांना होणाऱ्या त्वचेच्या रोगांमध्ये वाढ झाली आहे. येथे वेगळ्याच प्रकारचे किटक प्राण्यांवर हल्ला करत आहेत. बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार पिवळ्या रंगाच्या आक्रमक मुंग्यांमुळे येथील प्राण्यांना त्वचारोग होत आहेत. तसेच याच मुंग्याच्या हल्ल्यामुळे गुरे आंधळी होत असल्याचेही बीसीसीने दिलेल्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे पिवळ्या मुंग्यांच्या हल्ल्याचा पिकांवरही परिणाम होत असल्याचे येथील शेतकरी म्हणत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>> विश्लेषण : हिमाचल प्रदेशात आलेला ‘आकस्मिक पूर’ म्हणजे नक्की काय? भविष्यात अशा प्रकारच्या पुरांचे प्रमाण वाढणार?

पिवळ्या मुंग्या नेमक्या काय आहेत?

इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचरने (IUCN) जगातील सर्वात घातक, आक्रमक अशा १०० प्रजातींची यादी केलेली आहे. या यादीमध्ये पिवळ्या मुंग्यांचा समावेश केला आहे. या मुंग्या साधारणत: उष्णकटिबंधीय प्रदेशात आढळून येतात. त्यांच्या रंगामुळे त्यांना पिवळ्या मुंग्या असे नाव पडलेले आहे. विशेष म्हणजे या मुंग्या चावत नाहीत. मात्र त्या शरीरातून फॉरमिक अॅसिड बाहेर टाकत असल्यामुळे त्या सामान्य मुंग्यापेक्षा जास्त घातक ठरतात. या मुंग्याची वाढदेखील लवकर होते. त्यांच्या प्रजननाचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्या वन्यजीवांना अपायकारक ठरत आहेत.

हेही वाचा >>>> विश्लेषण : अर्थव्यवस्थेतील मंदीच्या पाउलखुणा पुरुषांच्या अंडरपँट्सच्या खपामध्ये हे वक्तव्य चर्चेत का?

ऑस्ट्रेलियन सरकारच्या वेट ट्रॉपिक्स मॅनेजमेंट ऑथॉरिटीने (WTMA) या मुंग्यांबद्दल अधिक माहिती दिली आहे. WTMA ने दिलेल्या माहितीनुसार या मुंग्या अंगाने सडपातळ असून ४ मीमी लांबीच्या असतात. त्यांच्या शरीराचा रंग सोनेरी तपकरी तर पोटाचा भाग हा गडद तपकिरी असतो. या मुंग्या दिवसा आणि रात्र अशा दोन्ही काळात अन्नाचा शोध घेतात. तीव्र उष्णता, तसेच ज्या भागात अतिवृष्टी होते अशा ठिकाणी या मुंग्या आढळण्याचे प्रमाण कमी आहे.

हेही वाचा >>>> “पंडितजी आतापर्यंत आम्ही पाच जणांना मारलंय,” भाजपाच्या माजी आमदाराचे धक्कादायक विधान

तामिळनाडूमध्ये या मुंग्यांनी नेमके काय केले ?

या पिवळ्या मुंग्यांमुळे दिंडीगुल जिल्ह्यातील कारंथमलाई जंगल परिसरातील गावात राहणाऱ्या ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. येथील बहुतांश लोक शेती किंवा पशुपालन करतात. अशा प्रकारच्या मुग्यांना काही वर्षांपूर्वी पाहिल्याचे या नागरिकांनी सांगितलेले आहे. मात्र प्रथमच य मुंग्या वस्त्यांमध्ये आढळत असल्याचे या गावकऱ्यांचे मत आहे. या मुंग्यांमुळे प्राणी आजारी पडत असल्यामुळे जंगल परिसरात राहणाऱ्या ग्रामस्थांनी स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला आहे. या मुंग्यांमुळे साप, गुरे मेल्याचे या ग्रामस्थांनी सांगितले आहे.

हेही वाचा >>>> पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या भाषणाच्या थेट प्रक्षेपणावर बंदी

दरम्यान, कीटकशास्त्राचे अभ्यासक डॉ. वैद्य यांनी या मुंग्या नेमकं काय करतात, याबाबत सविस्तर सांगितले आहे. “या मुंग्या फॉरमिक अॅसिड बाहेर टाकतात ज्यामुळे प्राण्यांच्या डोळ्यांना इजा पोहोचली असावी. मात्र या मुंग्या फक्त डोळ्यांनाच लक्ष्य करतात की शरीरातील इतर भागावरही फॉरमिक अॅसिडचा परिणाम होतो, याबाबत स्पष्टपणे सांगता येणार नाही,” असे वैद्य यांनी सांगितले. तसेच या मुंग्यांमुळे मानवी शरीराला अॅलर्जीचा त्रास होऊ शकतो. मात्र या मुंग्या माणसांना जीवघेण्या ठरणार नाहीत, असे सांगितले जात आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yellow ants causing blindness to cattle in tamil nadu know details prd