कोल्हापूर : येथील अॅड. अमित भालचंद्र बोरकर यांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून शपथ ग्रहण केली. सुमारे २५ वर्षांंहून अधिक काळ वकिली व्यवसायात असलेल्या बोरकर यांनी शिवाजी विद्यापीठाचे विधी सल्लागार म्हणून प्रभावी कामगिरी बजावली आहे. बोरकर यांना मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्राजोग यांनी शपथ दिली. मूळचे कोल्हापूर येथील असलेल्या बोरकर यांचे शनिवार ब्रँच शाळा, न्यू हायस्कूल, विवेकानंद महाविद्यालय व शहाजी विधी महाविद्यालय येथे उच्चशिक्षण झाले आहे. त्यांनी जुलै १९९४ ते मे १९९७ या कालावधीत कोल्हापूर जिल्हा, दिवाणी न्यायालयांसह अन्य प्राधिकरणांवर काम केले आहे. दिवाणी, घटनात्मक, सहकार, शिक्षण, व्यापार कायदे, शैक्षणिक, सेवा आदी विषयांतील खटल्याचे कामकाज त्यांनी पाहिले आहे. जून १९९७ पासून मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रधान पीठासमोर ते काम करीत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 15th Jan 2020 रोजी प्रकाशित
कोल्हापूरचे अॅड. अमित बोरकर उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश
जून १९९७ पासून मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रधान पीठासमोर ते काम करीत आहेत.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 15-01-2020 at 04:00 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Advocate amit borkar appoint additional judge of bombay high court zws