कोल्हापुरातील करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीच्या मूर्तीवरील काही भागांची झीज झाली आहे. रासायनिक प्रक्रिया करण्याबाबत पुरातत्त्व विभागाच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. याबाबत संबंधित विभागाचे पथक दोन दिवस दोन दिवसात मंदिरात येणार असल्याचे सोमवारी सूत्रांनी सांगितले.
हेही वाचा- कणेरी मठातील आजारी गाईंच्या प्रकृतीत सुधारणा
करवीर निवासिनी महालक्ष्मी मूर्तीची झीज होत असल्याचा जुना मुद्दा नव्याने चर्चेत आला आहे. काही वेळा मुर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात आली होती तरीही झीज सुरू असल्याने भाविकातून नाराजी व्यक्त होत आहे. यापूर्वी शिवसेना, शरद तांबट आदींनी मूर्ती बदलण्याची मागणी केली होती. तर काहींनी नवीन मूर्ती देण्याची तयारी केली होती.
हेही वाचा- कणेरी मठात ५० गाईंचा मृत्यू ; अन्नातून विषबाधा झाल्याचा अंदाज, वार्ताकन करणाऱ्या पत्रकाराला मारहाण
मूर्ती अभ्यासक प्रसन्न मालेकर म्हणाले, १९२० पासून मूर्तीची झीज होत असल्याचा मुद्दा चर्चेत आहे. २०१५ साली पुरातत्त्व विभागाच्या परवानगीने मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात आली मात्र ती टिकली नाही. मूर्तीच्या मागे कमरेला पितळी बार देऊन आधार देण्यात आला आहे. हाताची बोटे व पावले याची झीज झाली आहे. सप्टेंबर महिन्यात संवर्धन प्रक्रिया पुन्हा करण्यात आली तरीही झीज सुरू आहे. शास्त्रोक्तदृष्ट्या अशी मूर्ती पूजनयोग्य नाही. मूर्ती बदलण्याची गरज आहे, अशी मागणी त्यांनी केली.
हेही वाचा- आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल; मुश्रीफ समर्थक आक्रमक
दरम्यान, महालक्ष्मी देवीच्या मूर्तीवरून उलट सुलट चर्चा सुरू आहे. याबाबत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी यांनी आज सांगितले कि, मागील वेळी संवर्धन झालेल्या ठिकाणी झालेली झीज झालेली नाही. अलंकार, हात- पायाची बोटे या भागावर झीज आढळते. याबाबत पुरातत्त्व विभागाला कळवलेले आहे. त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. पुरातत्त्व विभागाची समिती दोन दिवसांमध्ये येणार आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी केले.
