कोल्हापूर : सन २०१९-२० साठी कोल्हापूर जिल्ह्याचे पीक कर्ज वितरण उद्दिष्ट २४३० कोटींचे आहे. ग्रामीण भागात कार्यरत असणाऱ्या प्रत्येक बँक शाखेने प्रत्येक महिन्याला पाच नवीन शेतकऱ्यांना पीक कर्ज स्वरूपात कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत सूचना जिल्हा प्रशासनाने बुधवारी बँकांना दिल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, जिल्हा नवीन वर्षांचा एकूण १२ हजार ८६९ कोटी रुपयांचा वार्षिक पतपुरवठा आराखडा बनविण्यात आला आहे. त्यापैकी प्राथमिक क्षेत्रासाठी ८ हजार ४३६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षांपेक्षा एकूण १४ टक्कय़ांनी या पतपुरवठा आराखडय़ामध्ये वाढ करण्यात आली आहे.   जिल्हास्तरीय बँकर्सची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली, यावेळीत्यांनी ही माहिती दिली. त्यांच्या हस्ते जिल्ह्याच्या पतपुरवठा आराखडय़ाचे प्रकाशनही करण्यात आले.

कृषी उत्पादनाला मिळणारे चांगले दर तसेच १०० टक्के शेतकरी बँकिंग व्यवस्थेखाली आणणे व त्याला लागणाऱ्या संलग्न सेवासाठी २०१९-२० या वर्षांसाठी ४ हजार ११५ कोटी रुपये तरतूद केली आहे. गेल्या ३ हजार ९३२  कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. कृषि क्षेत्रासाठी ठेवण्यात आलेल्या उद्दिष्टामध्ये रुपये २ हजार ४३० कोटी इतकी तरतूद पीक कर्जासाठी करण्यात आली आहे. यामध्ये खरीप हंगामासाठी रुपये १ हजार २१५ कोटी तर रब्बी हंगामासाठी रुपये १ हजार २१५ कोटी इतकी विभागणी करण्यात आली आहे. वार्षिक पतपुरवठा आराखडय़ात तरतूद करण्यात आल्याप्रमाणे इतर सूक्ष्म,लघु व मध्यम उद्योगांसाठी ३ हजार कोटी आणि इतर प्राथमिक क्षेत्रासाठी वाढ करून तब्बल १ हजार ३७५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five new farmers get crop loan every month in kolhapur district