सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राष्ट्रीय महामार्गावरील व महामार्गापासून ५०० मीटर अंतरापर्यंत दारू विक्री बंद करण्यात आली आहे. कोल्हापुरातील एका दुकानदाराने यावर शक्कल लढवत चक्क मंडप घालून दारू विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
कोल्हापुरातील स्कॉच हाऊस नावाच्या दुकानमालकाने चक्क नागरी वसाहतीतच मंडप घातला व दारू विक्री सुरू केली. मंडप घालून दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिसांनी समजताच त्यांनी त्या ठिकाणी छापा टाकला. यात पोलिसांनी एक हजाराहून अधिक मद्याच्या बाटल्या मिळाल्या. मंडपात मोठ्या भांड्यात सुमारे ७०० हून अधिक बिअर आणि ३०० हून अधिक विदेशी मद्याच्या बाटल्या अशा सुमारे १ हजाराहून अधिक बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या. सुमारे दीड लाख रूपयांचा हा ऐवज आहे. कारवाई करताना तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या वेळी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. या प्रकरणी एकाला ताब्यात घेतले असून शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 5th Apr 2017 रोजी प्रकाशित
कोल्हापुरात चक्क मंडप घालून मद्यविक्री, एकजण अटकेत
सुमारे दीड लाख रूपयांचा हा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 05-04-2017 at 09:38 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Liquor sale in tent at kolhapur police raid