राजाराम बंधाऱ्याच्या पातळीत घट

गेला आठवडाभर कोसळणाऱ्या पावसाने आता विश्रांती घेतली आहे. पावसाचा जोर ओसरला असल्याने अपेक्षेप्रमाणे धरणे भरली गेली नसल्याने बळीराजाची चिंता वाढीस लागली आहे. तर , शहरातील पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची पाणीपातळी गुरुवारी झपाट्याने कमी होताना दिसली. ४ जुल रोजी २३ फूट असलेली पाणी पातळी आज सकाळी २०.९ फूट होती, तर संध्याकाळी हीच पातळी १९.४ फूट इतकी खालावली होती. आज शिरोळ तालुक्यात नगण्य ०.२८ मि.मी. पाऊस पडला तर सर्वाधिक गगनबावडा तालुक्यात पडला. दूधगंगा हे सर्वात मोठे धरण आज अवघे १६ टक्के भरले असल्याने सर्वाची चिंता वाढली आहे.

पाटबंधारे विभागाच्या आजच्या नोंदीप्रमाणे कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्यावरील पाणीपातळी २० फूट ९ इंच, सुर्वे २० फूट , रुई ५० फूट , इचलकरंजी ४७ फूट ८ इंच, तेरवाड ४४ फूट ६ इंच, शिरोळ ३४ फूट, नृसिंहवाडी २९ फूट ९ इंच इतकी आहे.

पंचगंगा नदीवरील राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व िशगणापूर हे सात बंधारे पाण्याखाली आहेत, तर भोगावती नदीवरील राशिवडे, शिरगांव व खडक कोगे हे तीन बंधारे पाण्याखाली असून एकूण १० बंधारे पाण्याखाली आहेत.

जिल्ह्य़ात गेल्या २४ तासात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ३३.५ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, जिल्ह्य़ात काल दिवसभरात सरासरी १० मि.मी. पाऊस झाल्याची नोंद आहे. जिल्ह्य़ात १ जूनपासून आतापर्यंत एकूण ४५६१.११ मि. मि. पाऊस झाला आहे.

तालुकानिहाय पाऊस मि.मी मध्ये पुढील प्रमाणे आहेगगनबावडा ३३.५ करवीर ४.८१, कागल ७.०४, पन्हाळा ८, शाहूवाडी १६, हातकणंगले.१२, शिरोळ.५७, राधानगरी १०.६७ भुदरगड ११.८०, गडिहग्लज २.७१, आजरा १२.२५ व चंदगडमध्ये ११.५० मि.मी., अशी एकूण ११९.९७ मि.मि. पावसाची नोंद झाली.