X
X

Hong Kong Open Badminton : सिंधूचा विजयी चौकार; दुसऱ्या फेरीत प्रवेश

निर्णायक गेममध्ये केला पराभव

Hong Kong Open Badminton – या स्पर्धेत आज भारताच्या पी व्ही सिंधूने विजयी सलामी दिली. तृतीय मानांकित पी. व्ही. सिंधूने थायलंडच्या नीचाऑन जिंदापॉल हिला २१-१५, १३-२१, २१-१७ असे पराभूत केले. हा सिंधूचा हिच्यावरील चौथा विजय ठरला. पहिला गेम सिंधूने २१-१५ असा मोठ्या फरकाने जिंकला. पण दुसऱ्या गेममध्ये तिला पराभवाला सामोरे जावे लागले. जिंदापॉल हिने दमदार पुनरागमन करत पहिल्या गेममधील पराभवाचा जास्त फरकाने वचपा काढला. त्यामुळे तिसरा गेम हा निर्णायक ठरला. या गेममध्ये दोघींमध्ये सामना अटीतटीचा झाला. अखेर सिंधूने मोक्याच्या क्षणी गुण कमावत जिंदापॉल हिला ४ गुणांच्या फरकाने पराभूत केले आणि सामना जिंकला. तिचा पुढील सामना कोरियाच्या सुंग जी ह्यून हिच्याशी झाला.

याच स्पर्धेत पुरुष एकेरीच्या गटात स्विस आणि हैदराबाद खुल्या बॅडमिंटन स्पर्धांचे विजेतेपद पटकावणाऱ्या समीर वर्मा यानेही विजयी सलामी दिली. त्याने थायलंडच्या सुपान्यू अविहींग्सनॉन याचा पराभव केला. त्याने सरळ गेममध्ये हा सामना खिशात घातला. पहिला गेम २१-१७ने जिंकल्यावर दुसऱ्या गेममध्ये प्रतिस्पर्धी खेळाडूंकडून झुंज पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. पण ती अपेक्षा फोल ठरली आणि दुसरा गेम २१-१४ ने जिंकत समीरने पुढील फेरीत प्रवेश केला. त्याचा पुढील सामना चीनच्या चेन लॉंग याच्याशी आहे. साईप्रणीतला मात्र खोसीतविरुद्ध हार पत्करावी लागली. तो २१-१६, ११-२१, १५-२१ असा पराभूत झाला.

21
  • Tags: pv-sindhu,
  • Just Now!
    X