जॉर्ज बेलीच्या २० चेंडूंत ४९ धावांच्या वेगवान खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या ट्वेन्टी-२० लढतीत इंग्लंडवर ८४ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत ३-० असे निर्भेळ यश मिळवले.
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना १९५ धावांची मजल मारली. कॅमेरुन व्हाइटने ४१ धावा केल्या. बेलीने ४ चौकार आणि ३ षटकारांच्या साह्य़ाने नाबाद ४९ धावा करत ऑस्ट्रेलियाला पावणेदोनशेचा टप्पा ओलांडून दिला. इंग्लंडतर्फे स्टुअर्ट ब्रॉडने सर्वाधिक ३ बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडचा डाव १११ धावांतच आटोपला. इऑन मॉरगनने सर्वाधिक ३४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या नॅथन कोल्टिअर नील, ग्लेन मॅक्सवेल आणि जेम्स मुरिहेड यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Feb 2014 रोजी प्रकाशित
ऑस्ट्रेलियाच्या विजयात बेली चमकला
जॉर्ज बेलीच्या २० चेंडूंत ४९ धावांच्या वेगवान खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या ट्वेन्टी-२० लढतीत इंग्लंडवर ८४ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
First published on: 03-02-2014 at 02:48 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 3rd t20 george bailey bowlers help australia sweep series