परंपरागत प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतीक्षित मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी साऱ्यांचीच उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. अधिकृत प्रक्षेपणकर्ते ईएसपीएन-स्टार स्पोर्ट्स यांच्या तिजोरीत या मालिकेमुळे १४० कोटींहून अधिक रुपये जमा होणार आहेत.
भारत-पाकिस्तान मालिकेच्या पाश्र्वभूमीवर ईएसपीएन-स्टार स्पोर्ट्सच्या जाहिरात उलाढालीत मोठी वाढ झाली आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकदिवसीय सामन्यासाठी जाहिरातीचे दर ७ ते ७.५ लाख रुपये ठेवण्यात आले आहेत आणि ट्वेन्टी-२० सामन्यासाठी प्रती १० सेकंदांसाठी नऊ लाख रुपये दर ठेवला आहे. या छोटेखानी मालिकेतूनही ईएसपीएन-स्टार स्पोर्ट्सला १४० कोटी रुपयांपेक्षा अधिक फायदा होणार आहे.
ईएसपीएन-स्टार स्पोर्ट्स यांच्याकडून भारत-पाकिस्तान मालिकेचे स्टार क्रिकेट आणि स्टार क्रिकेट एचडीवर इंग्रजीतून आणि स्टार स्पोर्ट्सवर हिंदीतून प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Dec 2012 रोजी प्रकाशित
भारत-पाकिस्तान मालिकेच्या जाहिरातींचे दर गगनाला भिडले
परंपरागत प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतीक्षित मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी साऱ्यांचीच उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. अधिकृत प्रक्षेपणकर्ते ईएसपीएन-स्टार स्पोर्ट्स यांच्या तिजोरीत या मालिकेमुळे १४० कोटींहून अधिक रुपये जमा होणार आहेत.

First published on: 22-12-2012 at 05:10 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Advertising rates hit through the roof for indo pak series