एअर इंडियाने वरिष्ठ राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत विजेतेपदाला गवसणी घातली. त्यांनी अंतिम लढतीत पंजाबला ६-२ असे पराभूत केले. कर्नाटकने तिसरा क्रमांक पटकावला. मेजर ध्यानचंद स्टेडियमवर झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात एअर इंडियाने पूर्वार्धात २-० अशी आघाडी घेतली होती. त्यांच्याकडून आंतरराष्ट्रीय खेळाडू समीर दादने दुसऱ्या व ३९व्या मिनिटाला गोल केले, तर अफान युसूफने तिसऱ्या व ४२व्या मिनिटाला गोल नोंदविले. जोगा सिंग (५३ वे मिनिट) व सोमण्णा प्रधान (५८ वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल करीत संघाच्या विजयाला हातभार लावला. पंजाबकडून दोन्ही गोल आंतरराष्ट्रीय खेळाडू दीपक ठाकूरने करीत एकाकी लढत दिली. त्याने अनुक्रमे ५४ व्या व ६८ व्या मिनिटाला गोल नोंदवले. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात कर्नाटकने हरयाणावर ३-२ असा संघर्षपूर्ण विजय मिळविला. कर्नाटकच्या एम.जी.पुनेचा, निक्किन थिमय्या व एस.के.उथप्पा यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला. हरयाणाकडून दमणदीप सिंग व युधवीर सिंग यांनी प्रत्येकी एक गोल केला.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आंतरराष्ट्रीय खेळाडू पद्मश्री दिलीप तिर्की व हॉकी इंडियाचे अध्यक्ष मरिअम्मा कोशी यांच्या हस्ते झाला. या वेळी माजी ऑलिम्पिकपटू धनराज पिल्ले, बी. पी. गोविंदा, कर्नल बलबीरसिंग, अजित लाक्रा व इग्नेश तिर्की हे उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 11th Jun 2013 रोजी प्रकाशित
वरिष्ठ राष्ट्रीय हॉकी स्पर्धा : एअर इंडियाला विजेतेपद
एअर इंडियाने वरिष्ठ राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत विजेतेपदाला गवसणी घातली. त्यांनी अंतिम लढतीत पंजाबला ६-२ असे पराभूत केले. कर्नाटकने तिसरा क्रमांक पटकावला. मेजर ध्यानचंद स्टेडियमवर झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात एअर इंडियाने पूर्वार्धात २-० अशी आघाडी घेतली होती. त्यांच्याकडून आंतरराष्ट्रीय खेळाडू समीर दादने दुसऱ्या व ३९व्या मिनिटाला गोल केले,
First published on: 11-06-2013 at 02:31 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Air india emerge champions of the 3rd hockey india senior national championship