ICC Player Of The Month : भारतीय क्रिकेटपटूला मागे सारत ‘मुंबईकरानं’ जिंकला पुरस्कार; वाचा कोण ठरलं सर्वोत्तम

मागील वर्षी डिसेंबर महिन्यात त्यानं महापराक्रम करत क्रिकेटविश्वात खळबळ उडवून दिली होती.

ajazAjaz Patel Named ICC Mens Player Of The Month For December
एजाज पटेलला मिळाला आयसीसीचा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) न्यूझीलंडचा मुंबईकर फिरकीपटू एजाज पटेलला डिसेंबर २०२१ मधील सर्वोत्तम खेळाडू म्हणून सन्मान बहाल केला आहे. एजाज पटेलने डिसेंबरमध्ये इतिहास रचला. पटेलने वानखेडे स्टेडियमवर भारताविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या एका डावात १० बळी घेण्याची अप्रतिम कामगिरी केली. ही कामगिरी करणारा तो जिम लेकर आणि अनिल कुंबळे यांच्यानंतरचा तिसरा गोलंदाज ठरला. डिसेंबरमध्ये त्याने फक्त एकच कसोटी सामना खेळला, ज्यामध्ये त्याने १६.०७च्या सरासरीने १४ बळी घेतले.

पटेलने भारताविरुद्ध पहिल्या डावात सर्व १० विकेट घेतल्या आणि त्यानंतर दुसऱ्या डावात सलामीवीर मयंक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजाराच्या विकेट्ससह चार विकेट घेतल्या. या सामन्यात पटेलची गोलंदाजी २२५/१४ अशी होती. एजाज पटेलच्या कामगिरीवर भाष्य करताना आयसीसी व्होटिंग अकादमीचे सदस्य जेपी ड्युमिनी म्हणाले, ”ऐतिहासिक कामगिरी. एका डावात १० विकेट्स घेणे ही एक कामगिरी आहे, जी साजरी करणे आवश्यक आहे. एजाजची कामगिरी हा एक विक्रम आहे, जो दीर्घकाळ स्मरणात राहील यात शंका नाही.”

भारताचा कसोटी सलामीवीर मयंक अग्रवाल आणि ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क यांना डिसेंबर २०२१मधील कामगिरीसाठी नामांकन देण्यात आले होते. पण एजाजने बाजी मारली.

हेही वाचा – वर्ल्डकप स्पर्धेतून अफगाणिस्तान संघ होणार बाद..! वाचा नक्की घडलंय काय

१० विकेट घेणाऱ्या एजाज पटेलच्या जबरदस्त कामगिरीनंतर त्याची सर्वत्र चर्चा होत आहे. आयपीएलच्या पुढच्या मोसमाचा लिलाव लवकरच होणार आहे आणि अशा स्थितीत अनेक फ्रेंचायझींच्या नजरा एजाज पटेलवरही असतील. त्याचबरोबर पटेलनेही आयपीएलमध्ये खेळण्याबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, ”जर मला संधी मिळाली तर मला भारतात आयपीएल खेळायला नक्कीच आवडेल. ही एक उत्तम स्पर्धा आहे, मला संधी मिळाली तर मी स्वतःला भाग्यवान समजेन.”

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ajaz patel named icc mens player of the month for december adn

Next Story
वर्ल्डकप स्पर्धेतून अफगाणिस्तान संघ होणार बाद..! वाचा नक्की घडलंय काय
फोटो गॅलरी