शिवाजी पार्क जिमखानाच्या निवडणुकीला पूर्ण २२ उमेदवारांसह भारताचे माजी क्रिकेटपटू प्रवीण अमरे आणि अविनाश कामत यांचे पॅनल सज्ज असून प्रत्येक पदासाठी उमेदवार असलेले हे एकमेव पॅनेल आहे. या वेळी अध्यक्षपदासाठी अमरे यांच्यासमोर भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर उभे असून त्यांना खानोलकर गटाने पाठिंबा दिल्याने निवडणुकीची चुरस आणखी वाढली आहे.
याबाबत अमरे यांनी सांगितले की, ‘‘माझे वाडेकर यांच्याशी कोणतेच वैर नाही, ते आम्हाला ऋषीतुल्यच आहेत. पण अध्यक्षपदासाठी मी पहिल्या दिवशी अर्ज दाखल केला होता, वाडेकर सरांनी अखेरच्या दिवशी अर्ज भरला. त्यामुळे त्या वेळी जर मी माघार घेतली असती तर संपूर्ण पॅनेलवर त्याचा परिणाम झाला असता, त्यामुळे मी अध्यक्षपदासाठी उभा आहे. गेल्या निवडणुकीमध्ये २० जागा आमच्या पॅनेलने जिंकल्या होत्या. पॅनेलमध्ये सर्व उदेमदवार कामे करणारी आहेत आणि त्याच्या बळावरच आम्ही निवडून आलो होतो आणि या वेळीही नक्कीच येऊ.’’
अमरे-कामत पॅनेल पुढीलप्रमाणे-
अध्यक्ष : प्रवीण अमरे, उपाध्यक्ष : विलास साळुंखे, समाधान सरवणकर, सतीश घरत. विश्वस्त : अनिरुद्ध जोशी, मिलिंद सबनिस, प्रकाश नायक, कार्याध्यक्ष अविनाश कामत. उपकार्याध्यक्ष डॉ. एस. एम. मायदेव, सचिव : प्रदीप शिरगावकर, सहसचिव : सुनील रामचंद्रन, खजिनदार : विशाल सोमण, टेनिस सचिव : हिरेन कुलकर्णी, टेनिस सदस्य : संजीव महादेवकर, क्रिकेट सचिव : पद्माकर शिवलकर, क्रिकेट सदस्य : संदेश कावळे, कार्ड सचिव : अरुण ओक, बिलियर्ड्स सचिव : शेखर सुर्वे, इंडोर सचिव : प्रदीप भिडे, कँटीन सचिव : दिनकर महाले, समिती सदस्य : सनिल समेळ, नंदकुमार बोराटे.