अमेरिकन फुटबॉलपटू हसानी डॉट्सन स्टीफनसनने आपल्या गर्लफ्रेंडला फुटबॉलच्या मैदानावर प्रपोज केले. मेजर लीग सॉकर (एमएलएस) स्पर्धेमध्ये सॅन जोसे अर्थक्वेकविरुद्धच्या सामन्यानंतर स्टीफनसनने आपल्या प्रेयसीला प्रेमाचा प्रस्ताव दिला. या दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. स्टीफनसनने आपल्या प्रेयसीला गुडघ्यावर बसून प्रेक्षकांसमोर प्रपोज केले आणि अंगठीही घातली.

क्लब मिनेसोटा एफसीने सॅन जोसे अर्थक्वेकविरुद्धचा सामना २-२ असा बरोबरीत सोडवला. या सामन्यानंतर प्रेक्षकांनी सुंदर प्रेमाच्या गोष्टीचा अनुभवही घेतला. काहींनी हा क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. नेटवर व्हायरल झालेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर लोक खूपच पसंत करत आहेत. फुटबॉलर स्टीफनसनची गर्लफ्रेंड पेट्रा वुकोविच हिनेही तिच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर स्टीफनसन प्रपोज करत असल्याचा फोटो शेअर केला आहे.

 

हेही वाचा – IPLचं मेगा ऑक्शन ‘या’ महिन्यात होणार, दोन नवीन संघ येणार

गर्लफ्रेंड पेट्रा वुकोविचने हे फोटो शेअर करताना लिहिले, ”माझ्या मनातील हा आनंद व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत, तुमच्यावर प्रेम करणे हा एक आशीर्वाद आहे, सर्व शुभेच्छा दिल्याबद्दल आणि माझ्या आयुष्यात ही सुंदर आठवण दिल्याबद्दल धन्यवाद.”