Asia Cup 2022 IND vs PAK: आशिया चषक स्पर्धेमधील आजचा (४ सप्टेंबर) भारत-पाकिस्तान सामना रोमहर्षक ठरला. पाकिस्तानने पाच गडी राखून भारतावर विजय मिळवला. भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी १८२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पाकिस्तानच्या विरुद्ध भारताने आतापर्यंत केलेल्या धावांच्या यादीत आजचा सामना दुसऱ्या क्रमांकाचा होता मात्र तरीही भारताच्या काही चुकांमुळे अखेरीस पाकिस्तानला विजय प्राप्त करता आला. पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवान, मोहम्मद नवाझ या जोडीमुळे पाकिस्तान विजयापर्यंत पोहोचला तर क्षेत्ररक्षणामध्ये केलेल्या चुकांमुळेदेखील भारताला पराभवाला सामोरे जावे लागले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

(Video: पाकिस्तानच्या गोलंदाजाने चिडून चेंडू टाकला, दीपक हुडाने लगावला शानदार चौकार; भन्नाट ‘धनुरासन शॉट’ पाहिलात का?)

भारत पाकिस्तानचा सामना अटीतटीचा ठरला असला तरी भारताने सुरुवातीच्या टप्प्यात केलेल्या चुकांमुळे आधीच सामना हातून निसटताना दिसत होता. अशा काही क्षणांपैकी एक सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शेवटच्या षटकात गोलंदाजी केलेल्या अर्शदीपने आसिफ अलीचा एक अगदी सोप्पा झेल सोडला होता आणि हीच विकेट पुढे भारताला महाग पडली. या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा सुद्धा अर्शदीपवर चिडला होता.

अर्शदीप सिंहने कॅच सोडली..

अर्शदीप सिंह याने १८ व्या षटकात तिसऱ्या चेंडूवर झेल सोडून आसिफ अलीला जीवनदान दिले होते. आसिफने चेंडू हवेत टोलवल्यावर हा झेल खूप सहज घेता येईल असे वाटत होते मात्र अर्शदीपने हा झेल नेमका सोडला यानंतर रोहित शर्माने सरळ डोक्यालाच हात मारला. रोहितीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाकिस्तानने १८ व्या षटकांपर्यंत ४ गडी बाद असताना १५१ धावा केल्या होत्या. आसिफने पुढे ८ चेंडूंवर १६ धावा घेतल्या त्यानंतर शेवटी अर्शदीपनेच त्याला बाद केले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asia cup 2022 ind vs pak highlights what caused india lost match by 5 wickets arshdeep singh rohit sharma svs