अम्मान, जॉर्डन येथे सुरू असलेल्या आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय बॉक्सिंगपटूंनी विजयी सलामी दिली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या मनोज कुमारने ६४ किलो वजनी गटात जॉर्डनच्या स्थानिक इब्राहिम सालेहला चीतपट करत विजयी सुरुवात केली. नुकत्याच सायप्रस येथे झालेल्या बॉक्सिंग स्पर्धेत मनोजने रौप्यपदकाची कमाई केली होती. पुढच्या फेरीत मनोजचा मुकाबला श्रीलंकेच्या लाक मोहम्मद दिलशानशी होणार आहे. आक्रमक आणि वेगवान खेळाच्या जोरावर मनोजने शानदार विजय साकारला. उंचीचाही मनोजने सुरेख उपयोग करून घेतला.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Jul 2013 रोजी प्रकाशित
आशियाई अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धा : भारतीय बॉक्सिंगपटूंची विजयी सलामी
अम्मान, जॉर्डन येथे सुरू असलेल्या आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय बॉक्सिंगपटूंनी विजयी सलामी दिली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या मनोज कुमारने ६४ किलो वजनी गटात जॉर्डनच्या स्थानिक इब्राहिम सालेहला चीतपट करत विजयी सुरुवात केली.
First published on: 03-07-2013 at 04:31 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asian boxing championship event indian boxer win opening match