पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या दृष्टिकोनातून आगामी श्रीलंका आणि पाकिस्तानविरुद्धच्या मालिकांसाठी ऑस्ट्रेलियाच्या ट्वेन्टी-२० संघात स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांचे पुनरागमन झाले आहे.

चेंडू फेरफारप्रकरणी एक वर्षांची बंदीची शिक्षा झालेल्या स्मिथ आणि वॉर्नर यांनी ऑस्ट्रेलियाच्या कसोटी आणि एकदिवसीय संघात यशस्वी पुनरागमन केले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेला २७ ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार आहे, तर पाकिस्तानविरुद्धची तीन सामन्यांची मालिका सिडनीत ३ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.

ऑस्ट्रेलियाचा संघ

आरोन फिंच (कर्णधार), अ‍ॅश्टॉन अगर, अ‍ॅलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, ग्लेन मॅक्सवेल, बेन मॅकडरमॉट, केन रिचर्ड्सन, स्टीव्ह स्मिथ, बिली स्टॅनलेक, मिचेल स्टार्क, अ‍ॅश्टॉन टर्नर, अ‍ॅन्ड्रय़ू टाय, डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅडम झम्पा.