ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० लढतीत विजयासाठीच्या २१४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या रवी बोपाराने २७ चेंडूंत ६५ धावांची झुंजार खेळी केली. मात्र तरीही इंग्लंडचा १३ धावांनी पराभव झाला. ऑस्ट्रेलियाच्या डावात कॅमरून व्हाइटने ४३ चेंडूंत ६ चौकार आणि ४ षटकारांसह ७५ धावांची खेळी केली. आरोन फिन्चने ५२ धावा केल्या. पदार्पणवीर ख्रिस लिनने १९ चेंडूंत ३३ धावांची वेगवान खेळी केली. प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडने नियमित अंतराने विकेट्स गमावल्या, मात्र बोपाराने २ चौकार आणि ७ षटकारांच्या साह्य़ाने ६५ धावांची एकाकी झुंज दिली. इंग्लंडने ९ फलंदाजांच्या मोबदल्यात २०० धावा केल्या. ऑस्ट्रेलियातर्फे नॅथन कोल्टर-निलेने ४ बळी घेतले. व्हाइटला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 30th Jan 2014 रोजी प्रकाशित
ऑस्ट्रेलिया विजयी; बोपाराची झुंज अपयशी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० लढतीत विजयासाठीच्या २१४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या रवी बोपाराने २७ चेंडूंत ६५ धावांची झुंजार खेळी केली.
First published on: 30-01-2014 at 12:51 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Australia extend england domination