गेल्या तीन दौऱ्यामध्ये भारतीय संघाची झालेली ससेहोलपट पाहता भारतीय संघाचे प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांच्या हकालपट्टीच्या बातम्यांना ऊत आला होता. पण या साऱ्या गोष्टींना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव संजय पटेल यांनी पूर्णविराम दिला आहे. बीसीसीआयचा फ्लेचर यांना पूर्णपणे पाठिंबा असून त्यांना पदावरून दूर करण्याचा सध्या तरी विचार नसल्याचा खुलासा पटेल यांनी केला.भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी फ्लेचर यांची हकालपट्टी करून या पदावर भारताचा माजी फलंदाज राहुल द्रविडची नियुक्ती करावी, असे म्हटले होते. गुरुवारी बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन यांनी बोलावले होते. शुक्रवारी संघ बांगलादेशला रवाना होतानाही फ्लेचर न दिसल्याने त्यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली असल्याची अफवा पसरली होती. पण या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याने पटेल यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 15th Mar 2014 रोजी प्रकाशित
सध्या फ्लेचरच भारतीय संघाचे प्रशिक्षक – पटेल
गेल्या तीन दौऱ्यामध्ये भारतीय संघाची झालेली ससेहोलपट पाहता भारतीय संघाचे प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांच्या हकालपट्टीच्या बातम्यांना ऊत आला होता.
First published on: 15-03-2014 at 03:36 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bcci has no plans to remove fletcher sanjay patel