विश्वविजेत्या सॅबेस्टियन वेटेल याने केलेल्या सर्वोत्तम कामगिरीसह रेड बुल संघाने पहिले दोन क्रमांक मिळविले आणि फॉम्र्युला-वन ग्रां. प्रि. शर्यतीपूर्वीच्या सराव सत्रात वर्चस्व राखले. जगातील सर्वोत्तम चालक किताब लागोपाठ चौथ्यांदा जिंकण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या वेटेलने सराव शर्यतीत एक मिनिट २५.९०८ सेकंद वेळ नोंदविली आणि प्रथम क्रमांक मिळविला. त्याचा ऑस्ट्रेलियन सहकारी मार्क वेबरने दुसरे स्थान घेतले. व्हेटेलने फेरारी संघाच्या फर्नान्डो अलोन्सो याला शेवटच्या टप्प्यात मागे टाकले. मॅक्लेरिन संघाचा खेळाडू जेन्सन बटन हा अकराव्या क्रमांकावर फेकला गेला. जर्मनीच्या निको रॉसबर्ग याने मर्सिडीज संघाचे प्रतिनिधित्व करताना ही शर्यत एक मिनिट २६.३२२ सेकंदात पार केली. त्याला तिसरे स्थान मिळाले. माजी विश्वविजेत्या किमी रैक्कोनन याला चौथे स्थान मिळाले. त्याचा फ्रेंच सहकारी रोमेन ग्रोसजीन याने पाचवा क्रमांक मिळविला.
संग्रहित लेख, दिनांक 16th Mar 2013 रोजी प्रकाशित
वेटेलच्या सर्वोत्तम कामगिरीसह रेड बुल संघाचे वर्चस्व
विश्वविजेत्या सॅबेस्टियन वेटेल याने केलेल्या सर्वोत्तम कामगिरीसह रेड बुल संघाने पहिले दोन क्रमांक मिळविले आणि फॉम्र्युला-वन ग्रां. प्रि. शर्यतीपूर्वीच्या सराव सत्रात वर्चस्व राखले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 16-03-2013 at 04:32 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Best performance of sebastian vettel with red bull team command