चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० स्पध्रेची पात्रता फेरी मुळीच सोपी नसेल. उपखंडातील तीन संघांचे खडतर आव्हान स्पर्धेत असेल, असे मत न्यूझीलंडच्या ओटॅगो व्होल्ट्स संघाचा कर्णधार ब्रेन्डन मॅक्क्युलमने व्यक्त केले. मंगळवारपासून पात्रता फेरीच्या सामन्यांना प्रारंभ होणार आहे.
‘‘पात्रता फेरी आव्हानात्मक आहे. सर्व संघांकडे पाहा, कागदावर त्या मजबूत वाटत आहे. त्यामुळे पात्रता फेरीचा अडथळा पार करणे आम्हाला कठीण जाणार आहे. परंतु आम्ही मुख्य फेरीत पात्र ठरलो, तर आमची कामगिरी निश्चित ठसा उमटवणारी ठरेल, असे मॅक्क्युलम पुढे म्हणाला.