सौदी अरेबियाच्या क्लब अल नासरमध्ये त्याची प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, ख्रिस्तियानो रोनाल्डोने मंगळवारी रियाधमध्ये त्याच्या अधिकृत प्रेझेन्टेशनदरम्यान तो ‘दक्षिण आफ्रिकेत आला आहे’ असे चुकून सांगितले गेले. रोनाल्डो पत्रकार परिषदेत म्हणाला, “माझ्यासाठी दक्षिण आफ्रिकेत येणं माझ्या करिअरचा शेवट नाही. लोक काय म्हणतात याची मला खरोखर काळजी वाटत नाही. मी माझा निर्णय घेतला आणि तो बदल स्वीकारण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, परंतु माझ्यासाठी मी येथे आल्याचा आनंद खरोखर खूप मोठा आहे.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तथापि, सौदी अरेबिया ऐवजी साउथ (दक्षिण) आफ्रिकेचा उल्लेख हा स्पष्टपणे जीभ घसरल्याचे लक्षण होते आणि रोनाल्डोने याबद्दल आपण अनभिज्ञ असल्याचे दाखवून अल नासरमध्ये सामील होण्याच्या त्याच्या कारणांची रूपरेषा सांगितली आणि सॉकरच्या इतिहासातील सर्वात आश्चर्यकारक चालींपैकी एक पूर्ण करण्यासाठी त्याने जगभरातील ‘अनेक क्लब’ नाकारले आहेत.

याबाबतीत रोनाल्डो पुढे म्हणतो,“मला या देशाची आणि फुटबॉल विषयी वेगळी दृष्टी द्यायची आहे. त्यामुळेच मी ही संधी साधली. मला माहित आहे की लीग खूप स्पर्धात्मक आहे. लोकांना ते माहीत नाही, पण मला माहीत आहे कारण मी अनेक खेळ पाहिले आहेत.”रोनाल्डोने सौदी प्रो लीगमध्ये खेळण्यासाठी अडीच वर्षांच्या करारावर स्वाक्षरी केली आहे आणि तो वर्षाला $२०० दशलक्ष पर्यंत कमावणार आहे. माजी मँचेस्टर युनायटेड फॉरवर्डने असेही म्हटले आहे की गुरुवारी अल ताईचा सामना करताना अल नासरशी थेट खेळण्यास तयार आहे.

तथापि, ३७ वर्षीय रोनाल्डोला नोव्हेंबरमध्ये इंग्लिश फुटबॉल असोसिएशनने गेल्या एप्रिलमध्ये एव्हर्टनविरुद्धच्या सामन्यानंतर एका समर्थकाच्या हातातून मोबाइल फोन हिसकावून घेतल्याबद्दल दोन सामन्यांसाठी निलंबनाची कारवाई केली होती. परंतु त्याला शासन होण्याच्या वेळे आधीच त्याने युनायटेड क्लबला सोडले होते, परंतु एफएने सांगितले की निलंबन कोणत्याही नवीन क्लबमध्ये हस्तांतरित केले जाईल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cristiano ronaldo joins saudi arabian club al nasser but says he mistakenly arrived in south africa avw