इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा ऍशेस कसोटी मालिकेत धुव्वा उडविल्यानंतर आंतराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने(आयसीसी) कसोटी क्रमवारीत इंग्लंडने भारतीय संघाला पछाडून दुसरे स्थान मिळविले आहे.
आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत इंग्लंड संघाने ११६ गुणांसह दुसरे स्थान गाठले आहे. जर ऑस्ट्रेलिया संघाने ऍशेस कसोटी मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात विजय मिळविला असता, तर इंग्लंड तिसऱयास्थानावर कायम राहीली असती आणि भारताचे दुसरे स्थानही कायम राहीले असते. परंतु सामना अनिर्णीत राखण्यास इंग्लंडला यश आल्यामुळे इंग्लंडने कसोटी क्रमवारीत दुसरे स्थान पटकावले आहे. तसेच दक्षिण आफ्रिका संघ अव्वल स्थानावर कायम आहे. इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलिया संघाची क्रमवारीत पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे.