युरो चषकात पदार्पण करणाऱया आईसलँडने आपल्या पहिल्याच सामन्यात अव्वल फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्या पोर्तुगालला १-१ असे बरोबरीत रोखण्याचा पराक्रम केला. सामन्याच्या सुरूवातीला पोर्तुगालचे पारडे जड असल्याचे दिसत होते. पोर्तुगालचे गोल करण्याचे अनेक प्रयत्न देखील फसले, पण नानीने सामन्याच्या ३१ मिनिटाला अफलातून गोल करून संघाचे खाते उघडले. पहिल्या हाफपर्यंत सामना पोर्तुगालच्या बाजूने होता. आईसलँडने खचून न जाता दुसऱया हाफमध्ये संघर्ष कायम ठेवला आणि त्यांच्या प्रयत्नांना सामन्याच्या ५० मिनिटाला यश देखील आले. आईसलँडकडून बजारान्सनने गोल झळकावून बलाढ्य पोर्तुगालला धक्का दिला. त्यानंतर अखेरच्या मिनिटापर्यंत आईसलँडने पोर्तुगालला कडवी झुंझ देऊन आघाडी घेऊ दिली नाही व सामना बरोबरीत सोडवला.