फिफा विश्वचषकाचे संयोजनपदाचे हक्क देताना भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांवरून सध्या रणकंदन माजले आहे. आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. २०१८ आणि २०२२च्या विश्वचषकाच्या आयोजनाचे हक्क देताना झालेल्या गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी फिफाने स्वित्र्झलडच्या अॅटर्नी जनरलकडे फौजदारी तक्रार दाखल केली आहे.
२०१८ आणि २०२२च्या विश्वचषकाच्या आयोजनाचे हक्क अनुक्रमे रशिया आणि कतारने मिळवले. पण हे हक्क मिळवताना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या खात्यात मोठय़ा रकमा जमा झाल्या होत्या. मात्र पाच दिवसांपूर्वी फिफा विश्वचषकाचे आयोजन रशिया आणि कतारमध्येच होईल, असा निर्णय सुनावण्यात आला होता. ‘‘अनेकांच्या खात्यात मोठय़ा रकमा हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे संशय अधिक बळकट झाला आहे. या गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठीच आम्ही स्वित्र्झलच्या अॅटर्नी जनरलकडे धाव घेतली आहे,’’ असे फिफाच्या पत्रकात म्हटले आहे. स्वित्र्झलडचे अॅटर्नी जनरल मायकेल लौबेर यांच्याकडे अमेरिकेचे वकील मायकेल गार्सिया यांचा ४३० पानांचा गुप्त अहवाल सुपूर्द करण्यात आला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 20th Nov 2014 रोजी प्रकाशित
विश्वचषकाच्या संयोजनावरून फिफाची फौजदारी तक्रार
फिफा विश्वचषकाचे संयोजनपदाचे हक्क देताना भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांवरून सध्या रणकंदन माजले आहे. आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. २०१८ आणि २०२२च्या विश्वचषकाच्या आयोजनाचे हक्क देताना झालेल्या गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी फिफाने स्वित्र्झलडच्या अॅटर्नी जनरलकडे फौजदारी तक्रार दाखल केली आहे.
First published on: 20-11-2014 at 03:13 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa ask swiss police to launch criminal investigation into russia and qatar world cup bids following allegations of corruption