आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटनेच्या
(फिफा) अध्यक्षपदासाठी युनियन ऑफ युरोप फुटबॉल असोसिएशनचे (युएफा) प्रमुख मिचेल प्लॅटिनी मैदानात उतरणार आहेत. या पदाकरिता आठवडय़ाच्या अखेरीस उमेदवारीची घोषणा करणार असल्याची संकेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मिळत आहे.
अमेरिका आणि स्वित्र्झलड पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत फिफाच्या अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार आणि लाचखोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. त्यानंतर सेप ब्लाटर यांना अध्यक्षपद सोडावे लागले होते. रिक्त झालेल्या या पदासाठी प्लॅटिनी उत्सुक असल्याचे युएफाशी निगडीत सुत्रांनी सांगितले आहे. याबाबत प्लॅटिनींच्या प्रवक्त्यांनी अधिकृत माहिती देण्यास नकार दिला. गत आठवडय़ात फिफा कार्यकारिणीच्या झालेल्या बैठकीत अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी २६ फेब्रुवारी २०१६ ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 29th Jul 2015 रोजी प्रकाशित
फिफा अध्यक्षपदासाठी मिचेल प्लॅटिनी मैदानात
आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटनेच्या (फिफा) अध्यक्षपदासाठी युनियन ऑफ युरोप फुटबॉल असोसिएशनचे (युएफा) प्रमुख मिचेल प्लॅटिनी मैदानात उतरणार आहेत. या पदाकरिता आठवडय़ाच्या अखेरीस उमेदवारीची घोषणा करणार असल्याची संकेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मिळत आहे.
First published on: 29-07-2015 at 01:09 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa michel platini to announce presidency bid