फिफा विश्वचषक फुटबॉल स्पध्रेतील रंगतदार सामन्यांबरोबरच उपांत्य फेरीत कोणते संघ पोहोचणार ही उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. सट्टेबाजाराने हा फैसला आधीच करून टाकला आहे. त्यांच्या मते अर्थात ब्राझील आणि जर्मनी हे दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. अशा रीतीने त्यांनी भाव जाहीर केले
आजच्या सामन्यांचे अंतिम भाव :
फ्रान्स जर्मनी
सव्वा रुपया (११/५) ४५ पैसे (६/४)
ब्राझील कोलंबिया
९० पैसे (५/६) पावणेदोन रुपये (७/२)
निषाद अंधेरीवाला
अमेरिकेचे संरक्षणमंत्री.. टिम होवार्ड!
अमेरिकेचा गोलरक्षक टिम होवार्ड यांनी बेल्जियमविरुद्धच्या बाद फेरीच्या सामन्यात तब्बल १६ गोल वाचवल्यामुळे त्याने सर्वाचीच वाहवा मिळवली आहे. त्याला नेटप्रेमींनी नानाविध रूपात सादर केले आहे.
फुटबॉलरंगी रंगले श्वान!
विश्वचषकाचा ज्वर आता जगभरात जाणवू लागला आहे. फोर्टालेझा येथे शुक्रवारी ब्राझील आणि कोलंबिया यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना रंगणार आहे. या सामन्याच्या पाश्र्वभूमीवर कोलंबियाचे फुटबॉलप्रेमी