विश्वचषकाचा पहिला टप्पा आटोपला आहे. जगातल्या सर्वोत्तम ३२ संघांमधून १६ संघांनी विश्वचषकातील पहिला अडथळा पार करत बाद फेरी गाठली आहे. गटवार लढतीत चुकायला संधी असते, प्रयोग करता येतात, मात्र बाद फेरीत एक चूक स्पर्धेतील आव्हानच संपुष्टात आणू शकते. त्यामुळे ‘करो या मरो’ असा हा मुकाबला आहे. नेदरलँड्स आणि मेक्सिको बाद फेरीत आमनेसामने उभे ठाकले आहेत. बाद फेरीच्या रंगतदार
अन्य लढतीत, कोस्टा रिका आणि ग्रीस आमनेसामने आहेत. ऊर्जापूर्ण आवेशी खेळ हे कोस्टा रिकाचे वैशिष्टय़, तर शांत, संथ खेळ ही ग्रीसची खासियत. बाद फेरीत तुलनेने सोपी आव्हाने पेलणाऱ्या ग्रीसला बाद फेरीच्या लढतीत मात्र दमदार आव्हानाचा सामना करायचा आहे. युरोपात असल्याने ग्रीसच्या खेळाडूंना क्लब स्तरावरील सामने खेळण्याचा अनुभव आहे. कोस्टा रिकाचे पारडे जड वाटत आहे, मात्र चिवट खेळासाठी ओळखला जाणारा ग्रीसचा संघही कोस्टा रिकासाठी अडचण ठरू शकतो.
संग्रहित लेख, दिनांक 29th Jun 2014 रोजी प्रकाशित
नेदरलँड्सची मेक्सिकन कसोटी
विश्वचषकाचा पहिला टप्पा आटोपला आहे. जगातल्या सर्वोत्तम ३२ संघांमधून १६ संघांनी विश्वचषकातील पहिला अडथळा पार करत बाद फेरी गाठली आहे.
First published on: 29-06-2014 at 05:52 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa world cup 014 netherland vs mexico