यंदाच्या हंगामातला जबरदस्त फॉर्म कायम राखत लुईस हॅमिल्टनने ब्रिटिश ग्रां. प्रि. शर्यतीत अव्वल स्थान पटकावले. या शर्यतीचे हॅमिल्टनचे हे सलग दुसरे जेतेपद आहे. या विजयासह हॅमिल्टनने गुणतालिकेत संघसहकारी निको रोसबर्गला पिछाडीवर टाकत दमदार आघाडी घेतली आहे. तब्बल १ लाख चाळीस हजार चाहत्यांची उपस्थिती लाभलेल्या शर्यतीत हॅमिल्टनने १९४ गुणांसह अव्वल स्थान कायम राखले. सराव शर्यतीत हॅमिल्टनने पोल पोझिशन मिळवली होती. मात्र मुख्य शर्यत सुरू झाल्यानंतर अल्पावधीतच हॅमिल्टनने पोल पोझिशन गमावली. यंदाच्या हंगामातले हॅमिल्टनराज या शर्यतीद्वारे संपणार अशी शक्यता निर्माण झाली. मात्र हॅमिल्टनने व्यावसायिक खेळाचे सर्वोत्तम उदाहरण पेश करताना १०.९५६ सेकंदांच्या फरकाने बाजी मारली. हॅमिल्टनची घरच्या मैदानावरचे हे तिसरे, यंदाच्या वर्षांतले पाचवे तर कारकीर्दीतील ३८वे जेतेपद आहे. रोसबर्गने दुसरे तर वेटेलने तिसरे स्थान मिळवले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hamilton win british grand prix race