Harbhajan Singh Shoaib Akhtar Fight Video: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ येत्या १९ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे, ज्याचे सामने दुबई व्यतिरिक्त रावळपिंडी, कराची आणि लाहोर येथे होणार आहेत. भारताचे सर्व सामने दुबईत होणार आहेत. तर दुबईच्या या स्टेडियममधून एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये शोएब अख्तर आणि हरभजन सिंग भांडताना दिसत आहेत. दोघंही एकमेकांकडे रागात बघताना दिसत आहेत. यादरम्यानच त्याच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज म्हणजेच अख्तर हरभजन सिंगला धक्का देतो. पण या दोघांमध्ये नेमकं काय घडलं, जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे. पाकिस्तान या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सज्ज झाला असून ८ संघ खेळताना दिसणार आहेत. भारताचे सर्व सामने दुबईत होणार असून इतर सात संघांचे सामने रावळपिंडी, कराची आणि लाहोर येथे होणार आहेत. पण या स्पर्धेपूर्वी अनेक संघांना खेळाडूंच्या दुखापतीचा फटका बसला आहे.

पण चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दरम्यान हरभजन सिंग आणि शोएब अख्तर यांच्या व्हीडिओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पण हे दोन्ही माजी खेळाडू या व्हीडिओमध्ये खरंच भांडत नव्हते. पण व्हीडिओ नेमका काय आहे, पाहूया.

शोएब अख्तर आणि हरभजन सिंग यांच्यातील वादावादी दोघेही आपापल्या देशासाठी क्रिकेट खेळायचे, तेव्हापासून आपण पाहत आलो आहोत. जेव्हा-जेव्हा क्रिकेटच्या मैदानावर भारत-पाकिस्तान सामना होतो तेव्हा बहुतेक वेळा हरभजन आणि अख्तर कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असत. अशातच हे दोघेही दुबईतील एका कार्यक्रमासाठी मैदानात आले तेव्हाही काहीसे असेच दृश्य होते.

व्हिडिओमध्ये आपल्याला स्पष्ट दिसतंय की दोन्ही क्रिकेटपटू एकमेकांशी भिडण्यासाठी तयार झाले आहेत. हरभजनच्या हातात बॅट आहे आणि शोएब अख्तरच्या हातात चेंडू आहे. दोघेही एकमेकांना आव्हान देत पुढे जात आहेत आणि, जेव्हा दोघे एकमेकांच्या जवळ येतात, तेव्हा अख्तर हरभजनला धक्का देतो. यानंतर हरभजनच्या हावभावावरून असे वाटते की तो अख्तरला गोलंदाजी करायला सांगत आहे आणि फलंदाजी करताना मोठे फटके खेळत त्याची धुलाई करणार आहे.

हरभजन सिंग आणि शोएब अख्तर ILT20 च्या अंतिम सामन्यासाठी दुबईत आहेत. या दरम्यानचा हरभजन आणि शोएबचा हा व्हीडिओ भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वीचा माहोल तयार करत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत वि पाकिस्तानचा सामना २३ फेब्रुवारीला खेळवला जाणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harbhajan singh shoaib akhtar fight in dubai ignites indo pak rivalry ahead of champions trophy video goes viral bdg