काही तासांमध्ये चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होईल. सध्याच्या घडीला सुरू असलेल्या सराव सामन्यांनी स्पर्धेचा ज्वर सुरू झाला आहे आणि काही दिवसांतच तो टीपेला जाण्याची शक्यता आहे. ही स्पर्धा नेमकी कधी सुरू झाली, स्पर्धेचे नियम कसे बदलत गेले, सर्वाधिक यशस्वी ठरलेले खेळाडू कोण आणि या स्पर्धेचे भवितव्य काय, या साऱ्या गोष्टींवर टाकलेला एक दृष्टिक्षेप-

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑस्ट्रेलिया व भारताचे वर्चस्व

ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्या खात्यात सर्वाधिक दोन जेतेपदे आहे. ऑस्ट्रेलियाने २००६ आणि २००९ साली स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. २००२ साली स्पर्धेचा अंतिम सामना पावसामुळे रद्द करावा लागला. त्यामुळे भारत आणि श्रीलंका यांना जेतेपद विभागून देण्यात आले. २०१३ साली इंग्लंडमध्ये झालेल्या स्पर्धेत भारताने जेतेपदाला गवसणी घातली होती. दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, आणि न्यूझीलंड, यांनी प्रत्येकी एकदा जेतेपद पटकावले आहे.

पुढील स्पर्धेचे भवितव्य अधांतरी

या वर्षी ही स्पर्धा होणार असली तरी यापुढे होणार की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. २०२१ साली स्पर्धेचे यजमानपद भारताकडे देण्यात आले आहे. पण २०२१ साली आयसीसीने एकदिवसीय क्रिकेट लीग खेळवण्याचे ठरवले आहे. त्यामुळे जर लीग खेळवण्यात येत असेल तर या स्पर्धेचे महत्त्व जास्त राहणार नाही. त्यामुळे लीगबरोबर ही स्पर्धा खेळवायची की नाही, हा निर्णय आयसीसीला घ्यावा लागणार आहे.

गेल, मिल्स सर्वोत्तम

आतापर्यंतच्या स्पर्धेत सर्वाधिक ७९१ धावा वेस्ट इंडिजचा तडफदार सलामीवीर ख्रिस गेलच्या नावावर आहेत. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे महेला जयवर्धने (७४२ धावा) आणि कुमार संगकारा (६८३) हे श्रीलंकेचे फलंदाज आहेत. या यादीत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला (६६५) चौथा क्रमांक लागतो, तर दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू जॅक कॅलिस (६५३) पाचव्या स्थानावर आहे. गोलंदाजांमध्ये पहिल्या स्थानावर २८ बळींसह न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज कायले मिल्स आहे. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर श्रीलंकेचे मुथय्या मुरलीधरन (२४ बळी) आणि लसिथ मलिंगा (२२) आहे, तर चौथ्या आणि पाचव्या स्थानावर ऑस्ट्रेलियाच्या ब्रेट ली (२२) आणि ग्लेन मॅग्रा (२१) यांचा समावेश आहे.

गटवारी

अ गट

  • ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, न्यूझीलंड.

ब गट

  • भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका.
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc champions trophy 017