टी २० वर्ल्डकपपासून समालोचकांना ‘बॅट्समन’ ऐवजी ‘बॅटर’ बोलावं लागणार; कारण…

आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळानं येत्या काही दिवसात सुरु होणाऱ्या टी २० विश्वचषकापासून ‘बॅट्समन’ ऐवजी ‘बॅटर’ नावाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

icc-t20-world-cup-trophy-fb
टी २० वर्ल्डकपपासून समालोचकांना बॅट्समन ऐवजी बॅटर बोलावं लागणार (संग्रहित फोटो)

आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळानं येत्या काही दिवसात सुरु होणाऱ्या टी २० विश्वचषकापासून ‘बॅट्समन’ ऐवजी ‘बॅटर’ नावाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. मागच्या महिन्यात मेरिलबोन क्रिकेट क्लबने क्रिकेट नियमात बदल करत ‘बॅट्समन’ ऐवजी ‘बॅट’र शब्दाचा वापर करण्याचा निर्णय घेतला होता. आता आयसीसीच्या बॅटर या शब्दाचा वापर करण्यास सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. मागच्या चार वर्षात समालोचक बॅट्समन ऐवजी बॅटरचा या शब्दाचा वापर करत असल्याचं आयसीसीकडून सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर आयसीसीचे सीईओ ज्योफ अलार्डिस यांनी एमसीसीच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. स्त्री-पुरुष समानतेसाठी ‘बॅट्समन’ऐवजी ‘बॅटर’ हा शब्द त्वरित अमलात आणावा, अशी घोषणा मेरिलबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) केली होती.

“या शब्दाचा वापर आम्ही चॅनेल आणि समालोचन करताना गेल्या काही दिवसांपासून करत आहोत. आता हा शब्द लागू करणाच्या एमसीसीच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करत आहोत. हा बदल भविष्यासाठी आवश्यक आहे.” असं ज्योफ अलार्डिस यांनी सांगितलं. “फक्त भाषा बदलून खेळाची प्रगती होणार नाही. तर क्रिकेट खेळताना मुलं आणि मुलींना सारखाच अनुभव यावा हा उद्देश आहे.”, असंही त्यांनी पुढे सांगितलं.

T20 World Cup : आयसीसीनं जाहीर केली पंच आणि सामना अधिकाऱ्यांची यादी; ‘या’ दोन भारतीयांचा समावेश

आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने २०१७ मध्ये कायद्यांमध्ये बदल करताना महिला क्रिकेट फलंदाजांना काय संबोधलं जावं हा प्रश्न उपस्थित केला होता. यासाठी महिला क्रिकेटमधील प्रमुख व्यक्तींशी सल्लामसलत करण्यात आली होती. तेव्हा बॅट्समन हा शब्द कायम ठेवण्यात आला होता. मात्र आता या शब्दाचा वापर करण्यास सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Icc decided to replace batsman with gender neutral term batter rmt

Next Story
IPL 2021 : मॅच गमावली पण..! भर मैदानात CSKच्या खेळाडूनं आपल्या प्रेयसीला केलं प्रपोज; पाहा VIDEO
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी