IND vs AUS ICC Champions Trophy Travis Head Against India : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मंगळवारी (४ मार्च) होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्याकडे जगभरातील क्रिकेटरसिकांचं लक्ष लागलं आहे. या सामन्याच्या निमित्ताने भारतीय संघाकडे २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे. मात्र, भारतासाठी हे आव्हान इतकेही सोपे नसेल. ऑस्ट्रेलियाचा संघ मजबूत आहेच, त्याचबरोबर भारतीय संघासमोर आणखी एक आव्हान आहे ते म्हणजे ट्रॅव्हिस हेडचं. कारण हेडने आजवर भारताविरोधात जबरदस्त कामगिरी केली आहे. तसेच हेडने आतापर्यंत दोन वेळा भारताकडून आयसीसी चषक अक्षरशः हिसकावला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा आयसीसी स्पर्धेच्या बाद फेरीतील सामन्यात भारतासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान आहे. तसेच ट्रॅव्हिस हेडदेखील सज्ज आहे. त्यामुळे भारतीयांना धाकधुक लागली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ट्रॅव्हिस हेडमुळे भारत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२३ च्या अंतिम सामन्यात पराभूत झाला होता. त्यानेच ऑस्ट्रेलियाला २०२३ च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताविरोधात विजय मिळवून दिला होता. आणि तोच हेड आज पुन्हा एकदा आयसीसीच्या क्रिकेट स्पर्धेच्या बाद फेरीत पुन्हा एकदा भारतासमोर उभा ठाकला आहे.

आयसीसी स्पर्धेच्या बाद फेरीच्या सामन्यांमधील ट्रॅव्हिस हेडची कामगिरी

  • WTC 2023 चा अंतिम सामना – १७४ चेंडूत १६३ धावा, प्लेअर ऑफ द मॅच
  • WC 2023 चा उपांत्य सामना – ४८ चेंडूत ६२ धावा, प्लेअर ऑफ द मॅच
  • WC 2023 चा अंतिम सामना – १२० चेंडूत १३७ धावा – प्लेअर ऑफ द मॅच

ट्रॅव्हिस हेडची भारताविरोधातील कामगिरी

.एकदिवसीयकसोटीटी-२०
सामने१५
धावा३४५१,१६३२५५
सारासरी४३.१२४६.५२३६.४२
स्ट्राइक रेट१०१.७६६६.८७१५०.८७
शतके
अर्धशतके
सर्वोच्च धावसंख्या१३७१६३७६
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus travis head against india in icc tournament statistic champions trophy 2025 asc