IND vs ENG 2nd ODI Updates in Marathi: भारत वि इंग्लंड दुसरा कसोटी सामना कटकमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ३०४ धावा केल्या. यासह इंग्लिश संघाने भारताला विजयासाठी ३०५ धावांचे आव्हान दिले आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी रोहित शर्मा आणि शुबमन गिलची जोडी मैदानात उतरली. रोहित-गिलने दणक्यात सुरूवात केली, तर रोहितने चौकार षटकारांचा पाऊस पाडला. पण अचानक सामना थांबवण्यात आला असून दोन्ही संघांचे खेळाडू डगआऊटमध्ये परतले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहित आणि गिलने भारताच्या फलंदाजीची चांगली सुरूवात केली. रोहित शर्मादेखील चांगल्या लयीत दिसला होता आणि त्याने ३ मोठे षटकार खेचत दणक्यात सुरूवात केली. पण सातवे षटक सुरू होताच अचानक सामना थांबला.

६ षटकं झाल्यानंतर मैदानातील एक फ्लडलाईट अचानक बंद पडला आणि त्यामुळे सामना काही वेळ थांबवण्यात आला. त्यानंतर सामना पुन्हा सुरू झाला आणि गिलने साकिब महमूदच्या गोलंदाजीवर एक धाव घेत रोहितला स्ट्राईक दिली. रोहित फलंदाजीसाठी तयार होत असताना पुन्हा ती फ्लडलाईट बंद झाली आणि रोहितने डोकं हलवत निराशा व्यक्त केली. तितक्यात मैदानावरील प्रेक्षकांनी मोबाईलचे फ्लॅश सुरू केले.

खेळाडू बऱ्याच वेळ मैदानात लाईट सुरू होण्याची वाट पाहत होते. तितक्यात काही लाईट सुरू झाल्या पण अचानक फ्लडलाईटचा तो पूर्ण स्तंभच बंद पडला. आता ती फ्लडलाईट सुरू करण्याचं काम सुरू झालं. हे पाहताच रोहित शर्मा वैतागला आणि त्याने पंचांना बोलवून त्यांच्याशी चर्चा करायला सुरूवात केली. वैतागलेल्या रोहितशी चर्चा केल्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू मैदानाबाहेर जाऊ लागले. त्यानंतर दोन्ही संघाचे खेळाडू डगआऊटमध्ये परतल्यानंतर जोस बटलरने येऊन रोहितशी चर्चा केली. रोहित, गिल आणि साकिब महमूद पंचांशी चर्चा करत असताना इंग्लंडचा कर्णधार म्हणून तिथे उपस्थित नव्हता.

रोहित आणि गिलने मिळून ६ षटकांमध्ये ४७ धावा केल्या होत्या. ज्यात रोहित शर्मा १८ चेंडूत ३ षटकार आणि १ चौकारासह २९ धावा करत खेळत आहे, तर गिलने १९ चेंडूत ३ चौकारांसह १७ धावा केल्या आहेत. दोन्ही खेळाडू चांगले फॉर्मात असल्याने अचानक सामना थांबवण्यात आल्याचा पर्याय फलंदाजीवर पडतो. त्यामुळे रोहित शर्मा वैतागलेला दिसला.

बराच वेळ डगआऊटमध्ये बसून वाट पाहिल्यानंतर फ्लडलाईट पुन्हा सुरू झाल्याने सामनाही पुन्हा सुरू झाला आणि रोहित शर्माने पहिल्याच चेंडूवर चांगला फटका खेळत २ धावा केल्या. सामना सुरू झाल्यानंतर आता भारताला विजयासाठी २५७ धावांची गरज आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs eng 2nd odi match stopped due to floodlights issue in cuttack rohit sharma chat with umpires bdg