चौथ्या वन-डे सामन्यात न्यूझीलंडने भारतावर 8 गडी राखून विजय मिळवला. ट्रेंट बोल्ट आणि कॉलिन डी-ग्रँडहोम यांनी भेदक मारा करत भारतीय संघाची दाणादाण उडवली. धोनी आणि विराट कोहलीच्या अनुपस्थितीत खेळणारा भारतीय संघ आज न्यूझीलंडच्या माऱ्यासमोर उघडला पडला. 50 धावसंख्येच्या आत भारताचा निम्मा संघ माघारी परतल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी धोनीचं संघात महत्वं किती आहे या विषयावर ट्विट करायला सुरुवात केली. धोनीच्या काही चाहत्यांनी त्याची मागच्या सामन्यातली आकडेवारी टाकत अशा प्रसंगात धोनी संघात असायलाच हवा होता असं म्हटलं.

अनेकांनी भारतीय संघाच्या खराब कामगिरीबद्दल मजेशीर ट्विट करत, धोनी आणि विराट संघात नसले की संघाची कशी परिस्थिती होते हे सांगितलं.

5 सामन्यांच्या मालिकेत भारताने 3-1 अशी विजयी आघाडी घेतलेली आहे. या मालिकेतला अखेरचा सामना रविवारी होणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.