India Women’s vs Australia Women’s Match Details: महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेत आज होणाऱ्या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना विश्वखापट्टणम खेळवला जाणार आहे. हा सामना सेमीफायनलमध्ये जाण्याच्या दृष्टीने भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. ऑस्ट्रेलियासमोर खेळताना भारतीय संघाचा रेकॉर्ड इतका खास राहिलेला नाही. पण जर गुणतालिकेत पुढे निघायचं असेल तर भारतीय संघाला हा सामना जिंकावा लागेल. दरम्यान जाणून या सामन्याबद्दल सर्वकाही.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील १३ वा सामना केव्हा होणार आहे?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील १३ वा सामना आज (१२ ऑक्टोबर) खेळवला जाणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना कुठे खेळवला जाणार आहे?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना विशाखापट्टणमच्या एसीए वीडीसीए स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना किती वाजता सुरू होणार आहे?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरू होणार आहे. तर नाणेफेक २:३० वाजता होईल.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना लाईव्ह कुठे पाहता येणार?

भारत आणि आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहू शकता.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना ऑनलाइन कुठे पाहता येणार?

हा सामना तुम्ही हॉटस्टारवर लाईव्ह पाहू शकता.

कसा आहे दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड?

भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ बलाढ्य संघांपैकी एक आहेत. दोन्ही संघांचा आतापर्यंतचा रेकॉर्ड पाहिला तर, दोन्ही संघ ५९ वेळा आमनेसामने आले आहेत. यादरम्यान ४८ सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. तर ११ सामन्यांमध्ये भारतीय संघाने बाजी मारली आहे. वर्ल्डकप स्पर्धेतील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर दोन्ही संघ १३ वेळेस आमनेसामने आले आहेत. यादरम्यान भारतीय संघाला केवळ ३ सामने जिंकता आले आहेत. तर उर्वरित १० सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने बाजी मारली आहे.