India vs South Africa 3rd T20 Highlights, 14 December 2023 : जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने १०६ धावांनी दणदणीत विजय नोंदवला. भारताने प्रथम फलंदाजी करताना ७गडी गमावून २०१ धावांची मोठी धावसंख्या उभारली होती, प्रत्युत्तरात प्रोटीज संघ अवघ्या ९५ धावांत गारद झाला. तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत ०-१ ने पिछाडीवर पडलेल्या टीम इंडियासाठी हा ‘करा या मरो’चा सामना होता. मालिकेतील हा शेवटचा आणि निर्णायक सामना जिंकून भारतीय संघाने मालिकेतही १-१ अशी बरोबरी साधली. भारताच्या विजयात सूर्यकुमार यादव आणि कुलदीप यादव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सूर्यकुमार यादवने झटपट शतक झळकावून भारतीय संघाला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. त्यानंतर कुलदीप यादवने ५ विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेला १०० धावांचा टप्पा ओलांडू दिला नाही.

Live Updates

IND vs SA 3rd T20 Highlights : तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत ०-१ ने पिछाडीवर पडलेल्या टीम इंडियासाठी हा ‘करो या मरो’चा सामना होता. मालिकेतील हा शेवटचा आणि निर्णायक सामना जिंकून भारतीय संघाने मालिकेतही १-१ अशी बरोबरी साधली.

18:01 (IST) 14 Dec 2023
IND vs SA 3rd T20 : वाँडरर्सवर ३२ टी-२० सामने खेळले आहेत

दक्षिण आफ्रिका संघाने जोहान्सबर्गमध्ये २४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, त्यापैकी १४ जिंकले आहेत आणि १० गमावले आहेत. एकूण टी-२० मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ २५ वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये भारताने १३ आणि दक्षिण आफ्रिकेने ११ सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला. न्यू वाँडरर्स स्टेडियमवर आतापर्यंत ३२ सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये यजमान दक्षिण आफ्रिकेने १४ जिंकले आहेत आणि पाहुण्या संघाने १० जिंकले आहेत. ८ सामन्यांत निकाल लागला नाही. भारताने जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ टी-२० सामने खेळले असून त्यात २ जिंकले आहेत.

17:47 (IST) 14 Dec 2023
IND vs SA 3rd T20 : जोहान्सबर्गच्या खेळपट्टीचा अहवाल काय सांगतो?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टी-२० सामना जोहान्सबर्ग येथील न्यू वाँडरर्स मैदानावर खेळवला जाईल. वाँडरर्सच्या मैदानावर फलंदाजांचे वर्चस्व असते. या मैदानावर भरपूर चौकार आणि षटकार मारले जातात आणि चांगल्या उसळीमुळे चेंडू सहजपणे बॅटवर येतो. मात्र, सुरुवातीला खेळपट्टीत ओलावा असल्याने वेगवान गोलंदाजांना मदत मिळते.

17:30 (IST) 14 Dec 2023
IND vs SA 3rd T20 : टीम इंडियाच्या विजयात पाऊस ठरू शकतो व्हिलन

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरी टी-२० हवामान अंदाज

हवामान वेबसाइट Accuweather नुसार, जोहान्सबर्गमध्ये सामन्याच्या दिवशी म्हणजेच १४ डिसेंबर रोजी सकाळी पावसाचा कोणताही अंदाज नाही मात्र, दुपारी आणि संध्याकाळी ३५ टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तापमान २६ ते २० अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. पूर्ण २० षटकांचा खेळ पाहिला मिळेल का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

IND vs SA 3rd T20 Highlights : तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत ०-१ ने पिछाडीवर पडलेल्या टीम इंडियासाठी हा 'करा या मरो'चा सामना होता. मालिकेतील हा शेवटचा आणि निर्णायक सामना १०६ धावांनी जिंकून भारतीय संघाने मालिकेतही १-१ अशी बरोबरी साधली. भारताच्या विजयात सूर्यकुमार यादव आणि कुलदीप यादव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.