दुबई : आर. प्रज्ञानंदला अखेरच्या फेरीत पराभूत करत भारताच्या २२ वर्षीय अरविंद चिथंबरमने दुबई खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

अरविंदने या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. त्याने आठव्या फेरीत अर्जुन इरिगेसीवर मात करत गुणतालिकेत अग्रस्थान मिळवले होते. या पराभवामुळे इरिगेसीची सलग २९ सामने अपराजित राहण्याची मालिका खंडित झाली. मग नवव्या फेरीत अरिवदने प्रज्ञानंदला नमवत जेतेपद निश्चित केले. स्पर्धेअखेरीस ग्रँडमास्टर अरिवदच्या खात्यावर ७.५ गुण होते. प्रज्ञानंदला सात गुणांसह संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. तसेच इरिगेसीने (६.५ गुण) संयुक्तरीत्या तिसरे स्थान मिळवले. म