भारताच्या रायफल, पिस्तूल आणि शॉटगन नेमबाज यांना पुढील वर्षी होणाऱ्या रिओ ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. गबाला, अझरबैजान येथे गुरुवारपासून सुरू होणाऱ्या आयएसएसएफ जागतिक अजिंक्यपद स्पध्रेत सर्वोत्तम कामगिरी करून ऑलिम्पिकमध्ये जास्तीत जास्त जागा पटकावण्याचे लक्ष्य भारतीय नेमबाजांसमोर आहे.
जागतिक अजिंक्यपद स्पध्रेत भारताचा मजबूत संघ दाखल झाला असून त्यामध्ये ऑलिम्पिक पदक विजेत्या अभिनव बिंद्रा, गगन नारंग आणि जितू राय यांच्यासह अपूर्वी चंडेला आणि गुरप्रित सिंग यांचा समावेश आहे. या पाचही नेमबाजांनी ऑलिम्पिकमध्ये स्थान निश्चित केले आहे. त्यामुळे या स्पध्रेत हिना सिधू, मानवजीत सिंग संधू, विजय कुमार, अयोनिका पॉल, चैन सिंग, अंकुर मित्तल आणि मोह. असाब यांना ऑलिम्पिक पात्रता मिळवण्याची संधी आहे. एअर पिस्तूल पुरुष व महिला प्रकारात व एअर रायफल पुरुष व महिला प्रकारात प्रत्येकी तीन खेळाडू ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवू शकतात.
संग्रहित लेख, दिनांक 6th Aug 2015 रोजी प्रकाशित
भारतीय नेमबाजांचे ऑलिम्पिक पात्रतेचे लक्ष्य
भारताच्या रायफल, पिस्तूल आणि शॉटगन नेमबाज यांना पुढील वर्षी होणाऱ्या रिओ ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवण्याची आणखी एक संधी मिळणार आहे.

First published on: 06-08-2015 at 02:21 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian shooters target olympic eligibility