‘आयपीएल’मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्धच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीर याने खुर्चीला लाथ मारल्याप्रकरणी त्याला सामन्याच्या १५ टक्के रकमेचा दंड ठोठावण्यात आला आहे, तर बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीला सामन्यात षटके संपविण्यात वेळकाढूपणा केल्यामुळे २४ लाखांचा दंड आकारण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सामन्यात कोलकाताच्या सुर्यकुमार यादव याने विजयी चौकार लगावत संघाला रोमंचकारी विजय प्राप्त करून दिला. विजयाच्या उत्साहात गंभीरने डगआऊटमध्ये खुर्चीवर लाथ मारली आणि कॅमेरामध्ये ही दृश्ये कैद झाली. गंभीरवर आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप निश्चित करण्यात आला आणि दंडाची कारवाई करण्यात आली. आयपीएलच्या नियमानुसार मैदान, क्रिकेट साहित्य आणि जर्सीचा अपमान केल्याप्रकरणी खेळाडूवर कारवाई केली जाऊ शकते. याअंतर्गत गंभीर दोषी आढळल्याने त्याला दंडाच्या कारवाईला सामोरे जावे लागले.

विराट कोहलीने हा सामना गमावला, पण त्यासोबतच धीम्या गतीने षटके टाकल्यामुळे त्याला २४ लाखांचा दंड ठोठावण्यात आला. याआधीही कोहलीला बंगळुरूच्या गोलंदाजांनी धीम्या गतीने षटके टाकल्याने १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2016 virat kohli fined rs 24 lakh for slow over rate gautam gambhir for kicking chair in dug out