इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार जो रुटने आयपीएलच्या अकराव्या हंगामात आपल्यावर बोली न लागल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. जानेवारी महिन्यात पार पडलेल्या अकराव्या हंगामाच्या लिलावासाठी जो रुटचा ‘महत्वाचा खेळाडू’ या गटात समावेश करण्यात आला होता. मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगली कामगिरी करुनही कोणत्याही संघमालकाने जो रुटवर बोली लावली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

IPL 2018 – एक दिवस आधीच उरकला जाणार आयपीएलचा स्वागत सोहळा, प्रशासकीय समितीकडून ठिकाणांमध्येही बदल

“केवळ चांगल्या रकमेची बोली लागते म्हणून मला आयपीएलमध्ये खेळायचं नव्हतं. टी-२० क्रिकेटचा जास्तीत जास्त सराव व्हावा यासाठी मी यंदा आयपीएल खेळणार होतो. मात्र प्रत्येक संघ व्यवस्थापनाने आपल्याला कोणत्या प्रकारचा खेळाडू हवा आहे याची रणनिती बहुदा आधीच ठरवली होती. त्यामुळेच चांगली कामगिरी करुनही माझी यंदाच्या आयपीएलमध्ये निवड झाली नाही.” गार्डीयन या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत रुट बोलत होता.

अवश्य वाचा – IPL 2018 : प्रशिक्षक पदाची जबाबदारी दिल्याबद्दल व्यंकटेश प्रसाद यांनी मानले संघ व्यवस्थापनाचे आभार

आयपीएलमध्ये संघमालक आणि व्यवस्थापनाला आपली दखल घ्यायला भाग पाडणं हे आपल्या हातात नसल्याचं जो रुटने स्पष्ट केलं. कसोटी आणि वन-डे क्रिकेटच्या तुलनेत मी आंतरराष्ट्रीय पातळीवर टी-२० क्रिकेट कमी प्रमाणात खेळलो आहे. मात्र ज्यावेळी मला संधी मिळाली, त्यावेळी मी चांगली कामगिरी केली आहे. आगामी काळात टी-२० विश्वचषक पार पडला जाणार आहे, त्यामुळे आयपीएलच्या सामन्यांमधून मी या स्पर्धेसाठी तयारी करण्याच्या विचारात होतो. मात्र दुर्दैवाने तसं काही झालं नाही. सध्या जो रुट आगामी कसोटी मालिकेसाठी सराव करतो आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I was disappointed for not being picked up for ipl says joe root