गुजरात टायटन्स आणि बंगळुरु यांच्यातील सामना चांगलाच रोमहर्षक ठरला. या सामन्यात गुजरात टायटन्सचा खेळाडू मॅथ्यू वेडने चांगलीच आदळआपट केली. चुकीच्या पद्धतीने बाद केल्याचा दावा करत त्याने ड्रेसिंग रुममध्ये जाऊन चांगलाच त्रागा केला. मात्र हाच त्रागा आता त्याला महागात पडला आहे. आयपीएलने त्याला दोषी ठरवून समज दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> जोराचा फटका मारताना पांड्याच्या हातातून निसटली बॅट, पंच बालंबाल बचावला, पाहा नेमकं काय घडलं?

सामन्यात नेमकं काय घडलं होतं?

गुजरातच्या २१ धावा झालेल्या असताना शुभमन गिल झेलबाद झाला होता. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी आलेला मॅथ्यू वेड आक्रमकपणे खेळत होता. मात्र ग्लेन मॅक्सवेलच्या चेंडूवर १६ धावांवर असताना तो पायचित झाला. बंगळुरुच्या खेळाडूंनी अपिल केल्यानंतर त्याला पंचाने बाद दिले. त्यानंतर लगेच आक्षेप घेत मॅथ्यू वेडने डीआरएस घेतला. मात्र रिव्ह्यूमध्ये तो पायचित झाल्याचे स्पष्ट झाले आणि त्याला बाद म्हणून जाहीर केले गेले.

हेही वाचा >>> हेल्मेट फेकले, बॅटही आपटली; बाद होताच मॅथ्यू वेड झाला लालबूंद, पाहा व्हिडीओ

पंचाच्या या निर्णयावर मॅथ्यू वेड असमाधानी दिसला. ड्रेसिंग रुममध्ये गेल्यानंतर मॅथ्यू वेडने आपला राग काढला. त्याने ड्रेसिंग रुममध्ये हेल्मेट फेकून दिले. तसेच त्याने खुर्चीवर जोरजोरात बॅट आदळली. याच कारणामुळे आयपीएलने त्याला कोड ऑफ कन्डक्ट अतंर्गत दोषी ठरवलं. त्याला लेव्हल एकच्या गुन्ह्यात दोषी ठरवण्यात आलंय. त्यानेदेखील आपली चूक मान्य केली असून यावेळी त्याला समज देण्यात आही. अशीच चूक पुन्हा केली तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते.

हेही वाचा >>> अफलातून ग्लेन मॅक्सवेल! एका हाताने टिपला भन्नाट झेल; शुभमन गिल अवघी १ धाव करुन तंबुत परतला

दरम्यान या सामन्यात गुजरात संघाने बंगळुरुसमोर १६९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. ही धावसंख्या गाठताना विराट कोहलीने चांगली खेळी केली. त्याने ७३ धावा केल्या. परिणामी बंगळुरु संघाला विजय सोपा झाला. बंगळुरु संघाने आठ गडी राखून गुजरातवर विजय मिळवला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Matthew wade reprimanded by ipl for breaking code of conduct prd
First published on: 20-05-2022 at 20:04 IST