Fan emotional front of Gautam Gambhir : आयपीएल २०२४ मध्ये गौतम गंभीरने कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या मार्गदर्शकाची भूमिका सांभाळताच केकेआरचे नशिब उजळले आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंत कोलकाता नाईट रायडर्सची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. सध्या केकेआर संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी असून संघ ट्रॉफी जिंकण्याची शक्यता आहे. केकेआरचे सर्व खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. अशात सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये गौतम गंभीरसमोर आपले मत मांडताना कोलकाता नाईट रायडर्सचा एक चाहता भावूक झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जेव्हापासून गौतम गंभीर पुन्हा कोलकाता नाईट रायडर्स कॅम्पमध्ये सामील झाला आहे, तेव्हापासून संघ आणि चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. अशा स्थितीत कोलकाता नाइट रायडर्सचा एक चाहता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये गौतम गंभीरला म्हणाला, “सर, मी तुमच्या सर्वात मोठ्या चाहत्यांपैकी एक आहे, मला एवढेच सांगायचे आहे, आता आम्हाला सोडून जाऊ नका. तुमच्याशिवाय आम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे.”

गौतम गंभीरचा चाहत्याला अश्रू अनावर –

यानंतर तो चाहता पुढे म्हणाला, “तुम्ही सोडून गेल्यावर आम्हाला किती त्रास झाला आहे, हे मी तुम्हाला समजावून सांगू शकत नाही. त्यामुळे मी तुम्हाला एका बंगाली गाण्याच्या माध्यमातून सांगतो. आम्ही तुम्हाला आमच्या हृदयात ठेवतो, कृपया आम्हाला आणखी त्रास देऊ नका.” या दरम्यान चाहत्यांला अश्रू अनावर झाले, ज्याचा व्हिडीओ केकेआरने एक्सवर शेअर केला आहे.

हेही वाचा – GT vs CSK : धोनीने डिव्हिलियर्सच्या ‘या’ विक्रमाशी केली बरोबरी, विराट-रोहितच्या खास क्लबमध्ये झाला सामील

गौतम गंभीरने केकेआरसाठी केलेले प्रयोग ठरले यशस्वी –

गंभीरने केकेआरमध्ये आणलेल्या मास्टरस्ट्रोकपैकी एक म्हणजे सुनील नरेनला सलामीवीर म्हणून प्रोत्साहन देणे. याव्यतिरिक्त, जेसन रॉयच्या जागी फिल सॉल्ट आणल्याने कोलकात नाईट रायडर्ससाठी आश्चर्यकारक काम झाले आहे. वरच्या फळीतील नरेन-सॉल्ट जोडीच्या सातत्याने धमाकेदार सुरुवात करुन दिली आहे, ज्यामुळे मधल्या फळीतील खेळाडूंवरील दडपणही दूर झाले आहे.

हेही वाचा – विराट-अनुष्का होणार मालामाल! चार वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या अडीच कोटींच्या शेअर्सची किंमत आठ पटीने वाढली

केकेआरने दोनदा जिंकलीय ट्रॉफी –

गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली केकेआरने दोनदा ट्रॉफी जिंकलीय २०११ ते २०१७ पर्यंत संघाचे कर्णधारपद भूषवल्यानंतर गौतम गंभीर कोलकाता नाईट रायडर्समध्ये मार्गदर्शक म्हणून परतला आहे. पण गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सने दोनदा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. २०१२ मध्ये पहिल्यांदा आणि २०१४ मध्ये केकेआरने आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Never leave us again kkr fan breaks down in front of mentor gautam gambhir video viral vbm