मुंबई इंडियन्सकडून सातत्यपूर्ण फलंदाज सूर्यकुमार यादवने आयपीएलमध्ये इतिहास घडवला आहे. पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात त्याने १७ धावा करून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. खरं तर, पंजाबविरुद्धच्या सामन्यापूर्वी, सूर्याने या हंगामात ५८३ धावा केल्या होत्या आणि १७ धावा केल्यानंतर, तो आयपीएल २०२५ मध्ये ६०० धावांचा टप्पा गाठणारा तिसरा खेळाडू बनला. यासह त्याने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे.
सूर्यकुमार यादवने यंदाच्या आयपीएलमध्ये शानदार फॉर्मात आहे. सूर्याने गेल्या १४ डावांमध्ये सलग २५ अधिक धावा केल्या आहेत. सूर्याने पंजाब किंग्सविरूद्ध सामन्यात ३९ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह ५७ धावा केल्या.
मुंबई इंडियन्सकडून खेळताना एकाहून अधिक हंगामात ६०० पेक्षा जास्त धावा करणारा सूर्यकुमार आयपीएलच्या इतिहासातील पहिला खेळाडू ठरला आहे. खरं तर, आतापर्यंत सूर्या आणि सचिन तेंडुलकर यांनी मुंबईकडून खेळताना आयपीएलच्या एका हंगामात प्रत्येकी एकदा ६०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. आता सूर्याने मुंबई इंडियन्सकडून खेळताना २ वेगवेगळ्या हंगामात ६०० हून अधिक धावा करण्याचा पराक्रम केला आहे.
सूर्यकुमार यादवने सचिन तेंडुलकरचा १५ वर्षे जुना विक्रम मोडला आहे. सचिनने आयपीएल २०१० मध्ये ६१८ धावा केल्या होत्या. त्यानंतर, तो आयपीएलमधून निवृत्तीपर्यंत कोणत्याही हंगामात ६०० धावांचा टप्पा गाठू शकला नाही. यानंतर सूर्यकुमार यादवने २०२३ मध्ये ६०५ धावा आहेत. आता सूर्याने २०२५ मध्ये पुन्हा ६०० धावांचा टप्पा गाठत सचिनला मागे टाकलं आहे.
सूर्यकुमार यादव आता एका हंगामात मुंबईसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. सचिन तेंडुलकरने आयपीएल २०१० मध्ये ६१८ धावा केल्या होत्या, पण सूर्यकुमारने आता त्याला मागे टाकले आहे.
एका सीझनमध्ये मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
सूर्यकुमार यादव – ६१९+ धावा (आयपीएल २०२५)
सचिन तेंडुलकर – ६१८ धावा (आयपीएल २०१०)
सूर्यकुमार यादव – ६०५ धावा (आयपीएल २०२३)
सचिन तेंडुलकर – ५५३ धावा (आयपीएल २०११)
लेंडल सिमन्स – ५४० धावा (आयपीएल २०१५)