इराण कतारमध्ये सुरु असलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेदरम्यान हल्ला करण्याचा विचार करत होता. या स्पर्धेमध्ये अडथळा निर्माण करण्याचा इराणचा डाव होता असा दावा इस्त्रायलमधील इस्त्रायल संरक्षण दलातील लष्करी गुप्तचर प्रमुखांनी केला आहे. यासंदर्भातील वृत्त ‘द जेरुसलेम पोस्ट’ने दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की पाहा >> ‘अल्लाह… अल्लाह… अल्लाह…’ सौदी अरेबियाच्या मिडफिल्डरचा मॅच डिसायडर Goal पाहून कॉमेंटेटरच झाला बेभान; पाहा Video

इस्त्रायलची राजधानी असलेल्या तेल अविवमध्ये राष्ट्रीय सुरक्षा अभ्यास संस्थेच्या (आयएनएसएस) कार्यक्रमातील भाषणामध्ये मेजर जनरल आहरोन हलिवा यांनी हे विधान केलं आहे. मात्र असा हल्ला करण्याचा विचार आणि प्रत्यक्ष हल्ला इराणने का केला नाही यासंदर्भातही हलिवा यांनी माहिती दिल्याचं वृत्तात म्हटलं आहे. विश्वचषक स्पर्धेचं आयोजन करणारा कतार या हल्ल्याला कशापद्धतीने उत्तर देईल याचा अंदाज नसल्याने इराणने हा विचार सोडून दिल्याचा दावा करण्यात आला आहे.

नक्की पाहा >> FIFA World Cup: एमबाप्पेचा भन्नाट हेडर अन् Goal..!!! Video झाला Viral; दमदार पुनरागमन करत फ्रान्सने ऑस्ट्रेलियाला लोळवलं

फिफा विश्वचषक २०२२ स्पर्धेची सुरुवात रविवारपासून झाली आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना १८ डिसेंबर रोजी पार पडणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या ३२ देशांमध्ये इराणचाही समावेश आहे. सध्या इराणमध्ये २२ वर्षी महसा अमिनी या तरुणाचा सप्टेंबर महिन्यात झालेल्या मृत्यूनंतर सुरु झालेलं आंदोलन अधिक हिंसक झाल्याचं पहायला मिळत आहे. इराणमधील मोरॅलिटी पोलीसांनी महसाला हिजाब योग्य पद्धीने परिधान न केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. महसाला बेदम मारहाण झाल्याचा आणि तिच्या शरीरावर अनेक मारहाणीच्या खूणा असल्याचा दावा तिच्या कुटुंबियांनी तिच्या मृत्यूनंतर केला होता. मात्र इराणमधील प्रशासनाने आणि सरकारी यंत्रणेनं हे दावे फेटाळून लावले.

नक्की वाचा >> FIFA World Cup: अनपेक्षितरित्या सामना जिंकल्याने ‘या’ देशात आज राष्ट्रीय सुट्टी; सरकारी, खासगी कार्यालये, शेअर बाजारही बंद

या आंदोलनाचे पडसाद विश्वचषक स्पर्धेमध्येही दिसून आले. सोमवारी इराणच्या संघाने आपल्या देशाचं राष्ट्रगीत गाण्यास नकार दिला. या माध्यमातून त्यांनी हिजाबवरुन सुरु असलेल्या वादावर न बोलताच बरंच भाष्य केलं. इराणच्या संघाची ही कृती सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे.

मेजर जनरल आहरोन हलिवा यांनी या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर इराणमधील सत्ताधारी त्यांचं पूर्ण वर्चस्व राहील यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगितलं. मात्र त्यावेळी त्यांनी पाश्चिमात्य देशांकडून लादण्यात आलेले निर्बंध अयोग्य असल्याचं हलिवा यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iran considered carrying out attack at fifa says israeli spy chief says the jerusalem post report scsg