यॉर्कशायरचा मधल्या फळीतील फलंदाज जो रूटची इंग्लंडचा सर्वोत्तम क्रिकेटपटूपदी निवड करण्यात आली आहे. ब्रिटिश स्पोर्ट्स जर्नलिस्ट आणि इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट मंडळ (ईसीबी) यांच्या संयुक्त विद्यमाने ही निवड करण्यात आली. रूटने यावेळी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन, अष्टपैलू मोइन अली आणि फलंदाज गॅरी बॅलन्स यांना मागे टाकत हा बहुमान पटकावला आहे. रूटने वर्षभरात जवळपास ९५च्या सरासरीने ११३५ धावा फटकावल्या आहेत. यामध्ये चार दीडशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने तीन शतके लगावली आहेत. काही दिवसांपूर्वी कसोटी संघाच्या उपकर्णधारपदी त्याची नियुक्तीही करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Joe root declare best england cricketer